शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१0४ गावांवर पाणीटंचाईचे सावट!

By admin | Updated: February 14, 2017 00:32 IST

चिखली तालुक्यातील स्थिती; जलस्रोतांनी गाठला तळ, ८२ गावात पाणीटंचाई.

सुधीर चेके पाटील चिखली(जि. बुलडाणा), दि. १३- सलग तीन वर्षांनंतर गत पावसाळय़ात तालुक्यात थोडासा दिलासादायक पाऊस झाल्याने यंदा पिकांची स्थिती उत्तम आहे; मात्र तीन वर्षांच्या अत्यल्प वृष्टीमुळे खालावलेल्या भूजल पातळीमुळे यंदा पाण्याची स्थिती थोडी चिंताजनक असून, आतापासूनच तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे, तर येत्या उन्हाळय़ात तालुक्यातील १४४ गावांपैकी आतापासूनच तब्बल ८२ गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, तर येत्या एप्रिलनंतर यामध्ये आणखी २२ गावे वाढणार असल्याने पाण्यासाठी हाहाकार उडणार असल्याचे चित्र आहे, तर आगामी काळात तीव्र पाणीटंचाईच्या सावटाखाली येणार्‍या गावांच्या टंचाईची तीव्रता लक्षात घेता पंचायत समितीच्यावतीने आढावा घेण्यात आला असून, उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.चिखली तालुक्यात तसेच परिसरात महत्त्वाच्या असलेल्या धरणात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला होता; मात्र उन्हाळा लागण्यास अद्याप अवधी असतानाही धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. लहान-मोठे प्रकल्प, पाझर तलाव, नद्या, विहिरी, बोअरवेल यावरच पाणीपुरवठय़ाची संपूर्ण मदार अवलंबून आहे; मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या जलस्रोतांनी तळ गाठायला सुरुवात झाली आहे. परिणामी, अनेक गावातील नागरिकांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून, ही समस्या येत्या काळात गंभीर रूप धारण करण्याची चिन्हे आहेत. या धर्तीवर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा पंचायत समितीला तयार केला असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, आडवे बोर, नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना राबविणे व नवीन हातपंप देणे अशा उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान तालुक्यातील उंद्री, दिवठाणा, आमखेड, बोरगाव वसु, तेल्हारा, उत्रादा, पेठ, किन्ही नाईक, कवठळ, खोर, टाकरखेड हेलगा, अंत्री खेडेकर, साकेगाव, मेरा बु. काटोडा, किन्ही नाईक, हिवरा नाईक, धोत्रा नाईक, ब्रम्हपुरी, कोलारी, गिरोला, पळसखेड दौलत, टाकरखेड मुसलमान, ऐनखेड, बोरगाव काकडे, रानअंत्री, भोकर, शेळगाव आटोळ, तोरणवाडा, डासाळा, हातणी, वळती, मालगणी, मोहदरी, असोला नाईक, मेडसिंग, चंदनपूर, सातगाव भुसारी, सोनेवाडी, अमोना, देऊळगाव धनगर, पिंपळवाडी, असोला बु., कोनड खु., शेलसूर, कव्हळा, सावरखेड नाईक, पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, पांढरदेव, शेलगाव जहॉं, आंधई, सोमठाणा, भोगावती, सैलानीनगर, तांबुळवाडी, मेरा खु., मलगी, शेलूद, शिंदी हराळी, चांधई, दहीगाव, महिमळ, सावंगी गवळी, भालगाव, बेराळा, हरणी, वैरागड, अंबाशी, ईसोली, शेलोडी, पाटोदा, वरवंड, करणखेड, खामखेड, खंडाळा मं., सावरगाव डुकरे, मुंगसरी, गांगलगाव, रोहडा, किन्होळा या ८२ गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे सावट असून, यावर मात करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या ८२ गावांव्यतिरिक्त एप्रिलनंतर अमडापूर, एकलारा, गुंजाळा, मनुबाई, मिसाळवाडी, मंगरूळ (इ.), इसरूळ, मंगरूळ नवघरे, सवणा, खैरव, काळोणावाडी, भरोसा, आंधई, धोडप, डोंगरशेवली, कोलारा, पळसखेड सपकाळ, माळशेंबा, केळवद, येवता, तेल्हारा व मुरादपूर या २२ गावांनादेखील तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.