शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सात मतदारसंघात १0१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 2, 2014 00:35 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघात १0१ उमेदवार रिंगणात.

बुलडाणा : विधानसभा निवडणूकीत बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक बंडोबांना आमीषांचा नैवद्य दाखवून शांत करण्यात आले. आज तब्बल ५९ उमेदवारांनी अर्ज मागे घे तले असल्यामुळे सात मतदारसंघामध्ये १0१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.या वर्षी उमेदवारी दाखल करण्याची एकच भाऊगर्दी उसळली होती. छानणीनंतर १६0 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी ५९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक म तदारसंघामध्ये चौरंगी व पंचरंगी अशी लढत होऊ लागली आहे. महायुती व आघाडी दुभंगल्यानंतर सर्वच मतदारसंघांमध्ये महत्वाच्या पक्षांचे किमान पाच उमेदवार रिंगणात आहे. स्वबळाचे बळ आजमाविण्यासाठी बंडखोरांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कसरत उमेदवारांना करावी लागते. सिंदखेडराजा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी सभापती रियाजखाँ पठाण यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरी टाळली. खामगावातही भाजपासमोरचे मतविभाजनाचे संकट अमोल अंधारे व कैलास फाटे यांच्या उमेदवारी अर्ज माघारीने कमी झाले आहे. जळगाव जामोदमध्ये सामाजिक समिकरणे समोर ठेवत बारी समाजातून उमेदवार रिंगणात राहू नये असा प्रयत्न केला गेला मात्र त्याला यश आले नाही. मेहकर म तदारसंघात राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाचे निशाण फडकाविणार्‍या मंदाकिनी कंकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळावे म्हणून या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. या मतदारसंघात १५ उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ३ वाजेपर्यंत या घडामोडी अतिशय वेगवान झाल्या हो त्या. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.