शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा; नदीकाठच्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा

By योगेश देऊळकार | Updated: October 11, 2022 16:15 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सध्या ज्ञानगंगा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे.

ढोरपगाव-पारेज : खामगाव तालुक्यातील तांदुळवाडी सिंचन शाखेंतर्गत येत असलेल्या गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खामगावसह नांदुरा शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या सद्य:स्थितीत मिटली आहे. नदीकाठच्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीपासूनच बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सध्या ज्ञानगंगा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. खामगाव औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे, तसेच कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणारे धरण म्हणून ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पाची ओळख आहे, तसेच ग्रामीण भागातील ज्ञानगंगा नदीकाठी, भालेगाव बाजार, काळेगाव, पोरज, दिवठाणा, रोहणा, निमकवळा, ढोरपगाव, हिवरा बु., जळका भडंग या गावांच्या पाणीपुरवठा विहिरी ज्ञानगंगा नदीकाठी आहेत. त्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात जलसाठा होत आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तांदुळवाडी सिंचन शाखा अभियंता लोकेश बोंबटकार, निम्न ज्ञानगंगा सहायक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता सुनील नागपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

निम्न ज्ञानगंगा प्रकल्प - २ ही तुडुंब

निमकवळा येथील निम्म ज्ञानगंगा प्रकल्प - २ सुद्धा तुडुंब भरला असून, १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ढोरपगाव येथील लघु प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तिन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास सांडवा प्रवाहित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्य खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.

अनेक गावांना पुराची भीती

खामगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराची भीती आहे. यामध्ये गेरू माटरगाव, श्रीधर नगर, गेरू, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, पिंपळगाव राजा, घाणेगाव, ज्ञानगंगा (काळवाई), वळती खु., वळती बु., वसाडी खुर्द, वसाडी बु., धानोरा खुर्द, धानोरा बु., वडगाव, खातखेड, वडाळी, रसूलपूर, खुदानपूर, नांदुरा तालुक्यातील भुईसिंगा, निमगाव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु., अवधा खुर्द, नारखेड, वरूड, डोनारखेड, हिंगणा दादगाव, हिंगणा इसापूर, दादगाव व दौडवाडा गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा