शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुला-मुलींच्या प्रमाणात १0 टक्के तफावत!

By admin | Updated: December 25, 2016 02:35 IST

शासनाचे प्रयत्न ठरले निष्फळ; मुलींच्या जन्मदरात वाढ नाहीच!

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. २४- स्त्री- पुरुष प्रमाण समान ठेवण्यासाठी शासन स्तरावरून ह्यबेटी बचाओह्णसारखे अभियान राबविण्यात येते; परंतू जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून ९२८ वरच अडकले आहे. यावर्षीसुद्धा जिल्ह्यात दरहजार मुलांमागे जवळपास ९0५ मुलींच्या जन्माचे प्रमाण असून, मुला-मुलींच्या या प्रमाणात दरवर्षी १0 टक्के तफावत कायम दिसून येत आहे.स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान ठेवण्याकरिता ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण मोहीम देशभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातसुद्धा गेल्या दोन वर्षांपासून स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. स्त्री-पुरुष प्रमाण समान आढळून येणार्‍या खेड्याला लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशा घोषणाही शासन स्तरावरून करण्यात आल्या होत्या. लिंग विषमता दिसून येणार्‍या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्येची मानसिकता मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग व समाजातील श्रीमंत वर्गात रुजली आहे. मात्र, आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष प्रमाणात तफावत आढळून येते. बुलडाणा जिल्ह्यातही दरहजार मुलांमागे जवळपास ९0५ मुलींच्या जन्माचे प्रमाण यावर्षी असून, मुला-मुलींच्या या प्रमाणात दरवर्षी १0 टक्के तफावत दिसून येत आहे. सन २0१४ पासून सन २0१६ पर्यंत मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ९२८ वरच थांबले आहे. बुलडाणा तालुक्यात मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २0१४-१५ मध्ये ९८२ व २0१५-१६ मध्ये ९४९, चिखली तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८६८ व २0१५-१६ मध्ये ९५४, देऊळगाव राजा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९३३ व २0१५-१६ मध्ये ९६६, जळगाव जामोद तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८८१ व २0१५-१६ मध्ये ८३९, खामगाव तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९७२ व २0१५-१६ मध्ये ९७९, लोणार तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८५९ व २0१५-१६ मध्ये ८३८, मलकापूर तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९१५ व २0१५-१६ मध्ये ९२९, मेहकर तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८७६ व २0१५-१६ मध्ये ८५२, मोताळा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ९६६ व २0१५-१६ मध्ये ८७८, नांदुरा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये १0३१ व २0१५-१६ मध्ये ८४३, संग्रामपूर तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८८५ व २0१५-१६ मध्ये ८८६, शेगाव तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८६६ व २0१५-१६ मध्ये ८८४, सिंदखेड राजा तालुक्यात सन २0१४-१५ मध्ये ८७५ व २0१५-१६ मध्ये ८६५ मुला-मुलींच्या जन्मांचे प्रमाण आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध कायदा असला तरी त्याचे निर्मूलन होण्यासाठी सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीचे मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ९0५! एप्रिल २0१६ ते ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण ९0५ आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात ९0६, चिखली ९१0, देऊळगाव राजा ८८९, जळगाव जामोद ९६१, खामगाव ९0९, लोणार ९२९, मलकापूर ९३९, मेहकर ९१५, मोताळा ८९६, नांदुरा ७२७, संग्रामपूर ८७0, शेगाव ८८१ व सिंदखेड राजा तालुक्यात ८८२ असे मुला-मुलींच्या जन्माचे प्रमाण आहे.