शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ध्वज निधी संकलनासाठी उरले १० दिवस: ८८ टक्के उद्दिष्ट अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:40 IST

३० नोव्हेंबर ही अंतीम मदत देण्यात आलेली असतानाही आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ८८ टक्के उद्दिष्ट अपूर्णच आहे. 

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: देशाचे रक्षण करणाºया सैनिकांच्या मदतीसाठी केले जाणारे ध्वज दिन निधी संकलन अंतीम टप्प्यात आहे.  मात्र ध्वज निधी संकलनाच्या या देशकार्यात राज्य उत्पादन शुल्काचा हात आखडता दिसून येत आहे. निधी संकनासाठी ३० नोव्हेंबर ही अंतीम मदत देण्यात आलेली असतानाही आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ८८ टक्के उद्दिष्ट अपूर्णच आहे.  सैन्यामधील ९० टक्के सैनिक हे ३५ ते ४० या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे. तसेच हा संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी सिमेवर कायम कार्यरत असणाºया सैनिकांच्या मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. सैनिकांसाठी भरघोस निधी जमा व्हावा, यासाठी शाळा, महाविद्यालयांसह शासनाच्या विविध विभागांना एक उद्दिष्ट देण्यात येते. सैनिकांसाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान असल्याने प्रत्येक नागरिक व विद्यार्थी जास्तीत जास्त निधी संकलनासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. परंतू या महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग माघारल्याचे दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला ध्वज दिन निधी संकलनाचे २ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. निधी संकलनासाठी केवळ १० दिवसांचा अवधी उरलेला असतानाही आतापर्यंत बुलडाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने केवळ १२ टक्के  म्हणजे ३० हजार रुपये निधी जमा केल्याची माहिती आहे. मागील वर्षीचाही निधी या विभागाने पूर्ण जमा केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

 

ध्वज निधी गोळा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर अंतीम मुदत आहे. मुदतीपर्यंत निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. प्रत्येकाने या देशकार्यात हातभार लावावा.- स. ह. केंजळे,जिल्हा सैनक कल्याण अधिकारी 

टॅग्स :buldhanaबुलडाणाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग