शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १० जण कोरोना पॉझिटिव्ह, २२ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार २१ संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह ...

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार २१ संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३ हजार ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील एक, खामगाव तीन, शेगाव एक, देऊळगाव राजा एक, चिखली एक, मेहकर तालुक्यातील तीन जणांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, मलकापूर, नांदुरा, लोणार, मोताळा, जळगाव जामादे, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. दुसरीकडे २८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख १४ हजार ९११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८६ हजार ५१२ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

--२,२४७ अहवालांची प्रतीक्षा--

तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी २ लाख २४७ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार २०० झाली असून, त्यापैकी २२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ६६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.