शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड समर्पित रुग्णालयात १० टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

बुलडाणा : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड समर्पित रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या लहान मुलांसाठी राखीव ...

बुलडाणा : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड समर्पित रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या साहाय्याने २५ टक्के बेड्सवर ऑक्सिजनची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास तिचा मुकाबला करताना आरोग्य सुविधांची कमतरता पडणार नाही, याची खरबरदारी घेत आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने सज्जता वाढवत आहे. ऑक्सिजन प्लांट, अैाषधी, परामेडीकल स्टाफ याचा सर्वंकष आढावा शुक्रवारी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर उपरोक्त बाब स्पष्ट झाली. दरम्यान, पुढील आठवड्यात जिल्ह्यात दुर्दैवाने तिसरी लाट जर आली तर किती व्यक्ती कोरोनाबाधित होऊ शकतात, लहान मुलांचे प्रमाण किती राहील या दृष्टीनेही आरोग्य यंत्रणा सध्या सर्वेक्षण करून त्यासंदर्भातील अंदाज २ जुलैला होणाऱ्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली. यासोबतच तालुकास्तरावर बालरोगतज्ज्ञांची एक कार्यशाळाही घेण्यात आली असून, जिल्हास्तरावरही एक कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

--तीन ठिकाणी प्रत्येकी ५० ऑक्सिजन बेड--

बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५० बेडवर ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १५ या प्रमाणे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध केली जात आहे. यासोबतच प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ३० बेडवर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत.

-- तीन हजार चाचण्यांची क्षमता--

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता प्रतिदिन तीन हजार संदिग्धांच्या चाचण्या करण्याची क्षमता आता निर्माण झाली आहे. बुलडाणा व खामगाव येथील कोविड तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने मोठा आधार मिळाला आहे.

--१६ ऑक्सिनज प्लांट--

दुसऱ्या लाटेत आलेल्या आरोग्य विषयक समस्या पाहता आता जिल्ह्यात आठ शासकीय व आठ खासगी असे एकूण १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले आहेत. प्रतिदिन १७ मेट्रिक टन एवढी महत्तम क्षमता विचारात घेऊन त्यांची निर्मिती केली गेली आहे. या व्यतिरिक्त समर्पित कोविड रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांटद्वारे ८० टक्के ऑक्सिजन, तर पीएसए प्लांटद्वारे एकूण आवश्यकतेच्या २० टक्के ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे यंत्रणेचे नियोजन झाले आहे. सध्या जिल्ह्यात २६० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध असून, सीएसआर फंडातून आणखी २०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स उपलब्ध करण्यात येत आहेत.

--ताण कमी करण्याचे नियोजन--

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान बुलडाणा आणि खामगाव येथील कोविड समर्पित रुग्णालयावर सर्वाधिक ताण वाढला होता. ही परिस्थिती पाहता तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून दोन्ही रुग्णालयांवर वाढलेला ताण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रसंगी गंभीर रुग्णांवरही अशा ठिकाणी उपचार होण्यास मदत होऊन ग्रामीण भागातील रुग्णांचीही पायपीट यामुळे वाचेल.