शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ८७ हजार शेतक-यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:24 IST

किसान एसएमएस सुविधेस बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी दिला प्रतिसाद.

नाना हिवराळेखामगाव(जि. बुलडाणा), दि. १९- शेतकर्‍यांना घरबसल्या एसएमएसद्वारे कृषीविषयक सल्ला देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, किसान एसएमएस सेवा सुरू केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार शेतकर्‍यांची आतापर्यंत एसएमएस सेवेमध्ये नोंदणी झाली आहे.शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे कृषीविषयक सल्ला, हा कार्यक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यस्तरावरील १३८ लाख शेतकर्‍यांपैकी किमान ५0 लाख शेतकर्‍यांना किसान एसएमएस सेवेमध्ये आणण्याचा शासनाचा मानस आहे. किसान एसएमएस सेवेद्वारे शेतकर्‍यांना घरबसल्या कृषिविषयक विविध योजनांची माहिती, हवामानाचा अंदाज, नवनवीन तंत्रज्ञान, खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करावयाची कामे, फळबाग, भाजीपालावर्गीय पीकनिहाय माहिती देण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग त्या भागातील शेतीची परिस्थिती ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडे (आत्मा) पाठविली आहे. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाते. या माहितीच्या आधारे त्या भागात पिकावरील रोगराई, कीडविषयक सल्ला, पेरणीची वेळ, मशागतीची योग्य वेळ याविषयी सविस्तर माहिती एसएमएसद्वारे पाठविली जाते. तालुका कृषी कार्यालयातील प्रती कृषी सहायक शेतकरी मित्र यांना किमान ५00 शेतकर्‍यांची माहिती नोंदणी करण्याचे लक्ष्यांक दिले आहे. शेतकर्‍यांच्या सार्वत्रिक विकासासाठी शासन कृषी विभागाकडून विविध उपाययोजना राबवित असताना आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा शेतकर्‍यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नरत आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक नोंदणीकृषिविषयक सल्ला तसेच पीक हवामानाचा अंदाज, याविषयी शेतकर्‍यांना माहिती किसान एसएमएस सेवेमधून मिळते. तालुकास्तरावर कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडे (आत्मा) शेतकरी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये जिल्ह्यातून खामगाव तालुक्यात सर्वाधिक २८ हजार ७0३ शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे., तर सर्वाधिक कमी नोंदणी शेगाव तालुक्यात ५७७0 शेतकर्‍यांची आहे. सर्वच शेतकर्‍यांना किसान एसएमएस सेवेमध्ये सामावून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.