शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१़ लाख २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

संदीप वानखडे, बुलडाणा जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले ...

संदीप वानखडे, बुलडाणा

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़. त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले हाेते़. त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे़. खरीप हंगामास सुरुवात हाेण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे़. जिल्ह्यातील १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून. १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़

खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़. या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली़. रब्बीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही़. अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेतमालाची विक्री करता आली नाही़. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा माेठा आधार असताे़; मात्र, मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते़. दहा दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात आल्याने पीक कर्ज वाटप रखडले आहे़. गतवर्षी एक लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १हजार २५५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले़. गत वर्षीपासून लक्ष्यांकाच्या अर्धेही कर्जवाटप हाेत नसल्याने तीन वर्षाआधी केलेल्या कर्जवाटपाचा आधार घेऊन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे़. यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे़; मात्र, १८ मे पर्यंत बॅंकांनी १० टक्के शेतकऱ्यांना ९ टक्केच रकमेचे वितरण केले आहे़. याच गतीने कर्ज वाटप झाल्यानंतर खरीप हंगामाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची भीती आहे़.

बॅंकांच्या कामकाजाची वेळ वाढवा

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बॅंकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केली आहे़. यादरम्यान नियमित ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत़. वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांची माेठी गर्दी हाेत असून, रांगा लागत आहे़त. त्यामुळे, काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त आहे़. त्यामुळे, प्रशासनाने बॅंकांचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवागनी देण्याची मागणी हाेत आहे़. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्याची गरज आहे़.

गावपातळीवर शिबिरे घेण्याची गरज

पीक कर्ज वाटपाची गती माेठ्या प्रमाणात मंदावल्याचे चित्र आहे़. त्यामुळे गावपातळीवर विशेष शिबिरे घेउन पीक कर्जाचे वाटप करण्याची गरज आहे़. तसेच पीक कर्जाची प्रकरणे तातडीने निपटवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी हाेत आहे़.

खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्याने सर्वच बॅंकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़. १८ मे पर्यंत १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना ११६ काेटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे़. येत्या काही दिवसांत पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात येणार आहे़.

नरेश हेडाउ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा