WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 12:53 PM2021-01-07T12:53:58+5:302021-01-07T12:55:46+5:30

हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे.

rhea chakraborty pr may pays 2 rupees for twittes in supports of her social media users claimed | WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा

WHAT? रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला मिळताहेत पैसे? सोशल मीडियावर होतोय दावा

googlenewsNext
ठळक मुद्देसुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली. आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणा-याला पैसे मिळत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. आता हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या फॅन पेजवर रियासंदर्भात हा दावा केला जातोय. रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणा-या प्रत्येकाच्या खात्यात तिची पीआर  टीम प्रत्येक ट्वीटमागे  दोन रूपये जमा करत असल्याचा हा दावा आहे. सुशांतच्या फॅन पेजवर ‘जस्टिस फॉर रिया’ नावाने केल्या गेलेल्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला गेला आहे. 

‘रिया परत आलीये आणि ती मनातून आनंदी आहे. तू खंबीर असल्याचे एक चांगले उदाहरण जगापुढे ठेवलेस,’ असे यात लिहिले आहे.
दुस-या स्क्रिनशॉटमध्ये संबंधित ट्वीट करणा-याच्या खात्यात 2 रूपये ट्रान्सफर करण्यात आल्याचा मॅसेज दिसतोय. अखेरच्या ट्वीटटसाठी तुमच्या खात्यात 2 रूपये ट्रान्सफर करण्यात आलेय, असा हा मॅसेज आहे. हे स्क्रिनशॉट्स व्हायरल  झाल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
आता या स्क्रिनशॉट्स आणि या दाव्यात किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. रिया स्वत: यावर काय खुलासा करते, हे पाहणे अशात इंटरेस्टिंग ठरणार आहे.

तूर्तास रिया मुंबईत नवे घर शोधतेय. सुशांत प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या रियाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर तिला जामीन मंजूर झाला. मात्र अद्यापही मीडिया तिचा पिच्छा सोडायला तयार नाही. अशात रियाला तिच्या सोसायटीने राहते घर खाली करण्याची नोटीस बजावल्याचे कळतेय. रिया, तिचे आईवडिल अलीकडे मुंबईत घर शोधताना दिसले होते. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर पडली. तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी रिया राहते घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे.

PICS : अनेक महिन्यानंतर घराबाहेर पडली रिया चक्रवर्ती, टी-शर्टवरील मॅसेजने अख्ख्या जगाला दिले उत्तर

Web Title: rhea chakraborty pr may pays 2 rupees for twittes in supports of her social media users claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.