ranu mondal troll for showing attitude to media |  चक्क मीडियालाच अ‍ॅटिट्यूड दाखवू लागली रानू मंडल, विश्वास बसत नसेल तर पाहा हा नवा व्हिडीओ
 चक्क मीडियालाच अ‍ॅटिट्यूड दाखवू लागली रानू मंडल, विश्वास बसत नसेल तर पाहा हा नवा व्हिडीओ

रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल सध्या स्टार झालीय. हिमेश रेशमियाने आपल्या चित्रपटात रानूला गाण्याची संधी दिली आणि रानू एका रात्रीत प्रकाशझोतात आली. आता तर तिच्या आयुष्यावर बायोपिकही बनतेय. तिच्याकडे पर्सनल मॅनेजर आहे. हजारो चाहते आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून रानू तिच्या अ‍ॅटिट्यूडमुळे चर्चेत आहे. चाहत्यांना आणि मीडियाला अ‍ॅटिट्यूड दाखवणारी रानूचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामुळे रानूला प्रचंड ट्रोल केले जात आहे.


एक रिपोर्टर रानूची प्रशंसा करत, तिला प्रश्न विचारते. स्वप्न पूर्ण होतात. तुला इतके मोठे यश मिळाले, काय तुला विश्वास बसतो? असा प्रश्न रिपोर्टर रानूला करते. पण या प्रश्नाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत रानू तिच्या बॅगेतून काहीतरी काढते आणि खाते. यानंतरही आपले जणू लक्षच नाही, अशा तो-यात ती रिपोर्टरकडे दुर्लक्ष करते. रिपोर्टर दुस-यांदा तिला प्रश्न विचारते. हा व्हिडीओ समोर येताच, रानूवर प्रचंड टीका होत आहे.  


काही दिवसांपूर्वी एका चाहतीला फटकारतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  रानू मंडल दिसताच एक चाहती रानू जवळ येते आणि हात लावून बोलण्याचा प्रयत्न करते, असे या व्हिडीओत दिसले होते. पण चाहतीचे अशा प्रकारे हात लावणे रानूला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती रागात ‘डोन्ट टच मी, आय एम सेलिब्रेटी नाऊ’ असे म्हणते. या व्हिडीओनंतरही रानू ट्रोल झाली होती. स्टारडम  मिळाल्यामुळे रानू मंडलच्या डोक्यात हवा गेल्याची प्रतिक्रिया अनेकांनी त्यावेळी दिली होती.  

Web Title: ranu mondal troll for showing attitude to media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.