Birthday Special : विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 06:00 AM2019-06-14T06:00:00+5:302019-06-14T06:00:00+5:30

पंजाबमधील चंडीगढ येथे अभिनेत्री किरण खेर यांचा १४ जून, १९५५ साली शीख कुटुंबात जन्म झाला. सिनेमा, रिएलिटी शो व्यतिरिक्त किरण खेर यांनी राजकारणातही आपली छाप उमटविली आहे.

kiran Kher was in love with a married actor, Her love story is interesting | Birthday Special : विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

Birthday Special : विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

googlenewsNext

पंजाबमधील चंडीगढ येथे अभिनेत्री किरण खेर यांचा १४ जून, १९५५ साली शीख कुटुंबात जन्म झाला. सिनेमा, रिएलिटी शो व्यतिरिक्त किरण खेर यांनी राजकारणातही आपली छाप उमटविली आहे. 


किरण खेर यांनी १९८५ साली अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. किरण खेर यांनी १९८० साली चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मुंबई गाठली. याच दरम्यान किरण खेर यांना एका मोठ्या बिझनेसमॅन गौतम बेरी यांच्यावर प्रेम झालं आणि त्या दोघांनी लग्नदेखील केलं. 


काही वर्षांनंतर किरण यांनी मुलगा सिकंदरला जन्म दिला. त्यानंतर किरण खेर व त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या नात्यात काही ठीक नसल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर अनुपम खेर यांनी त्यांच्या घरातल्यांच्या सांगण्यावरून १९७९मध्ये मधुमालती नामक एका तरूणीशी विवाह केला. पण ते दोघेही त्यांच्या विवाहित जीवनापासून खूश नव्हते. 


किरण खेर व अनुपम खेर यांनी थिएटरमध्ये काम करणं सोडलं नव्हते. एकेदिवशी नादिरा बब्बर यांच्या नाटकासाठी दोघे कोलकाताला गेले होते. त्यावेळी त्या दोघांची पुन्हा भेट झाली.

नाटक संपल्यानंतर त्या दोघांना जाणवलं की त्यांच्यात काहीतरी आहे. त्यानंतरच्या भेटीत अनुपम खेर यांनी किरण यांना प्रपोझ केला. त्यानंतर ते दोघं वारंवार भेटले आणि त्यांच्यातील नातं आणखीन बहरत गेलं.

त्यानंतर त्या दोघांनी आपल्या पार्टनरना घटस्फोट दिला आणि १९८५ मध्ये ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर अनुपम यांनी सिकंदरला आपले आडनाव लावले. किरण खेर व अनुपम खेर यांना एकही मुल नाही.


किरण यांनी अनुपम खेर यांना अडीअडचणीत साथ दिली. दोघांच्या जीवनात एकदा अशी वेळ आली होती जेव्हा अनुपम खेर यांच्याकडे पैशांची तंगी असल्यामुळे ते त्रस्त असायचे. इतकेच नाही तर अनुपम खेर यांच्याकडे काम नव्हते. ते घरी रिकामे बसले होते.

या दरम्यान असंही वृत्त आलं होतं की त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत पण किरण यांनी परिस्थितीशी सामना केला आणि आज हे कपल आपल्या जीवनात खूप आनंदी आहेत.

Web Title: kiran Kher was in love with a married actor, Her love story is interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.