शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता वाढीसाठी जि.प. शाळेत ‘एजीआर’ उपक्रम

By admin | Updated: December 22, 2014 22:40 IST

सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत आहे. विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. तरी जिल्हा परिषदांच्या शाळा यात मागे पडत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बालकांना दर्जेदार

साधन व्यक्तींचा समावेश: पुढील सत्रापासून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राजू बांते - भंडारासर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत आहे. विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. तरी जिल्हा परिषदांच्या शाळा यात मागे पडत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बालकांना दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. आता २०१४-१५ या वर्षात भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये ए (अ‍ॅडव्हांस), जी (जनरल), आर (रिमेडियल) हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुणवत्ता वाढीसाठी साधन व्यक्तीची मदतशैक्षणिक गुणवत्तेचे वाढ करण्यासाठी जिल्हास्तरावर उच्चस्तर सुकाणू समिती, जिल्हा कार्यकारी समिती तसेच तालुका कार्यकारिणी समिती, जिल्हा शिक्षण मंडळ यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात ४१ विषय साधनव्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. मोहाडी तालुक्यात सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमासंबंधी केंद्रप्रमुख यांच्याशी गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी उपक्रमासंबंधी चर्चा केली. केंद्रप्रमुखांनी सर्व शाळांना एजीआर उपक्रमाची माहिती मुख्याध्यापकांना दिले आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीला मोहाडी तालुक्यात सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमातंर्गत एजीआर योजनेची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान विषयातील किमान अध्ययन पातळी व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या अनुषंगाने अ,ब,क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. दुसरी व आठवीमधील शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे, उपचारात्मक अध्ययन, अध्यापन साहित्य विकसीत करणे, शैक्षणिक चाचण्या, विकसित करणे, तिमाही नियोजन करणे, श्रेणीनुसार अध्ययन साहित्य विकसित करणे, विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे, विद्याथ्योचे सर्वांगिण गुणवत्ता विकास व संवर्धन करणे हे एजीआर योजनेचे उद्दीष्ट आहेत. या बाबी वास्तवात येण्यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ११ व १२ जानेवारी रोजी भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांची पूर्व संपादणूक चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीतील मूल्यमापनावरुन अ,ब,क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. संपादणूक विकसनाची जबाबदारी कार्यकारी समितीने जिल्हा शिक्षण मंडळाकडे सोपविली आहे. या शिक्षण मंडळात डायट अधिनिस्थ व कार्यरत साधनव्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. पूर्व चाचणीच्या अंमलबजावणीची जबाबदारी तालुका कार्यकारी समितीकडे देण्यात आली आहे. पूर्व संपादणूक चाचणीसाठी केंद्रांतर्गत शिक्षकांची अदलाबदल होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रगत अध्ययन साहित्य विकसित करणे‘अ’ श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिकतेचा विकास होण्यासाठी प्रगत अध्ययन साहित्य विकसित करणे, त्यांच्या बुद्धिमत्तेला पटेल, रुचेल असे अध्ययनाबाबत मार्गदर्शन व पूरक साहित्य विकसित करून शाळांना वितरित केले जाणार आहे. विज्ञान गणित व इंग्रजी विषयांची तयारी करून घेणे व स्वयंअध्ययन करण्यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी करणे.अध्यापनात आधुनिकतेची जोड ‘ब’ ब श्रेणी मध्ये विद्यार्थ्यांचा शोध घेऊन यांचेसाठी अप्पर श्रेणी सुधारण्यासाठी अभ्यासक्रमाच्या एनसीएफ, एससीएफच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्ञान रचनावादाच्या प्रभावी वापर करून अभ्यासक्रमाचे नियोजन करणे. सामान्य विद्यार्थ्यांच्या बुद्धांकाचा विचार करून पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देवून अध्ययन, अध्यापन करणे व श्रेणी सुधारासाठी शिक्षकांना प्रोत्साहन करण्यात येणार आहे. शिक्षकांचे वाढविणार प्रोत्साहन ‘क’ श्रेणीसाठी शिक्षणाचा अधिकार कायद्यामध्ये सुचविल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील शाळांमध्ये क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा शोध घेवून बालस्नेही शिक्षण पद्धतीने व आनंददायी वातावरणामध्ये क श्रेणीतील विद्यार्थ्यांचा उर्ध्वगामी स्तर उंचावण्यासाठी अतिरिक्त पुरक मार्गदर्शन, उपचारात्मक अध्ययन अध्यापन व निदानात्मक चाचण्या वापरण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.