शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प., पं.स. निवडणुकीचा बिगूल वाजला

By admin | Updated: June 5, 2015 00:47 IST

मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या राजकीय पक्ष आणि पदाधिकारी ही निवडणुकीच्या तारखेविषयी उत्सुक होते.

भंडारा : मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या राजकीय पक्ष आणि पदाधिकारी ही निवडणुकीच्या तारखेविषयी उत्सुक होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारला सायंकाळी भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.त्यानुसार या निवडणुकीसाठी दि.३० जून रोजी मतदान आणि २ जुलै रोजी मतमोजणी होणार असून गुरुवारला मध्यरात्री १२ वाजतापासून आचारसंहिता लागू झाली आहे.५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या तुमसर, मोहाडी, भंडारा, पवनी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासूनच मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.रणसंग्राम प्रतिष्ठेचा अन अस्तित्त्वाचा एका पाठोपाठ एक निवडणुका जिंकल्यानंतर मनोबल उंचावलेल्या भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता टिकवून ठेवायची आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवणुका जिंकून अस्तित्त्व निर्माण करायचे आहे. त्यामुळे या निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची राहणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा हे पक्ष इच्छुक उमेदवारांचे त्या भागातील प्रस्थ पाहूनच संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)असा राहील निवडणूक कार्यक्रमराज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, १० ते १५ जून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे देण्यात येतील व स्वीकारली जातील. १६ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी होईल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन पत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निणर्याविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे १९ जूनपर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी २२ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याचदिवशी तेथील निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अपील असलेल्या ठिकाणी २४ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याचदिवशी तेथेही निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्राची यादी २४ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. ३० जून रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होईल. दि. २ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.कमी वेळेत उमेदवारांची परीक्षाआचारसंहिता आजपासून लागेल उद्यापासून लागेल या प्रतिक्षेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना आता उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठीकडे येरझारा माराव्या लागणार आहेत. ५ ते ३० जून या २५ दिवसाचा निवडणूक कार्यक्रम आहे. प्रत्येक पक्षांकडे उमेदवारीसाठी गर्दी सुरू आहे. अद्याप कुणाचीही उमेदवारी निश्चित नाही. त्यामुळे यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे १२ ते १४ दिवसात मोर्चेबांधणी करावी लागेल. रिंगणातील यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना केवळ सहा दिवस प्रचारासाठी मिळणार आहे.