शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांना जि.प. सदस्याचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:42 IST

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास कार्यक्रम अंतर्गत करावयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देमंगेश मेश्राम यांचा आरोप : दोषीविरूद्ध कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास कार्यक्रम अंतर्गत करावयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. परंतु लाखनी व लाखांदूर पंचायत समितीत ठरवून दिलेली कामे करण्यास तेथील जि. प.सदस्य विरोध करीत असल्याचे भजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम यांनी लाखनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.लाखनी पंचायत समिती अंतर्गत मुरमाडी सावरी, खुणारी, रेंगेपार तसेच पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत पिंपळगाव व तिरखुरी येथील कामांना जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे मंजुरी देण्यात आली. परंतु जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोरे यांनी पं. स. लाखनी अंतर्गत मुरमाडी सावरी, रेंगेपार कोहळी व सेलोटी येथील कामे करू नये असे सांगितले. लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रस्ताव मंजूर करू नयेत असे सांगितल्याने दलित वस्तीत करावयाच्या रस्ते व नाली बांधकामास खीळ बसत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना त्यांना शासनाकडून मिळणाºया मुलभूत सुविधापासून राजकीय द्वेषापायी वंचित ठेवले जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून दोषीवर कारवाई करावी व दलित व नवबौद्धांना त्यांच्या सुविधांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मंगेश मेश्राम यांनी केली आहे. यावेळी निरज मेश्राम, मंगेश गेडाम, शेषराव वंजारी, राजेश खराबे, पडोळे, गिºहेपुंजे, वंजारी उपस्थित होते.दलित वस्ती बांधकाम संदर्भात सेलोटी येथील काम सुरू आहे. रेंगेपार कोहळी येथील पाणी पुरवठ्याचा खर्च एमबी प्रमाणे ३९ हजार परत न केल्याने दलित वस्तीचे काम थांबले, मुरमाडी येथील दलित रस्त्याचे बांधकामचे आमदार निधीतून झाले आहे. त्यामुळे हे बांधकाम समाजकल्याण समितीने नामंजूर केला आहे. मंजूर व नामंजूर करण्याचा समाज कल्याण समितीला अधिकारी आहे.-हेमंत कोरे, जि.प. सदस्य भंडारा.