शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

जि.प.च्या २३८ शाळा धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:26 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे भवितव्य जोपासणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : मोहाडी तालुक्यात सर्वाधिक ५४ जीर्ण ईमारतीप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे भवितव्य जोपासणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातील २३८ शाळा इमारती धोकादायक स्थितीत असून या जीवघेण्या ईमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असल्याचे वास्तव आहे.भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ७६९ जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळामध्ये भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे अशी संकल्पना राज्य शिक्षण विभागाने आखली आहे. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून शाळा प्रगतीपथावर नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजीटल शाळा, यु डायसच्या माध्यमातून शाळांची इत्यंभूत माहिती व विद्यार्थ्यांची प्रगती यासह विविधांगी प्रयोगाची अंमलबजावणी प्रत्येक शाळेत करण्यात येत आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांच्या नावावर कागदोपत्री चित्र रंगविण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.भंडारा, लाखनी, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली व लाखांदूर अशा सात तालुक्यांमधून जिल्ह्यातील सुमारे ६० हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्जनाचे धडे गिरवित आहेत. मात्र यातील अर्ध्याधिक विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात असल्याची विदारक परिस्थिती समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील २३८ शाळा अत्यंत धोकादायक स्थितीत असतानाही पर्यायी व्यवस्था न केल्याने तिथेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. सर्वाधिक धोकादायक किंवा मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींमध्ये मोहाडी तालुक्याचा अग्रक्रम लागतो. मोहाडी तालुक्यात ५४ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर तुमसर तालुक्याचा क्रमांक लागतो. तिथे ४५ शाळा इमारती मोडकळीस आल्या आहेत. भंडारा पंचायत समितीमध्ये ३५, पवनी ३०, लाखांदूर व लाखनी येथे प्रत्येकी २७ तर साकोली येथे २० शाळा अशा एकुण २३८ शाळा धोकादायक स्थितीत आहेत. यावर्षी एकही वर्गखोली नाहीसर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांसह विद्यार्थ्यांच्या देखभालीची जबाबदारी सर्वशिक्षा अभियानावर आहे. यावर्षी नवीन एकही वर्गखोली मंजूर करण्यात आलेली नाही. २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात ८० वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १५-१६ या वर्षात २ तर यावर्षी ० असा क्रम सर्व शिक्षा अभियानाचा लागला आहे. शाळांची अद्ययावत माहिती यु-डायसवरशाळांची भौगोलिक स्थिती व अन्य माहितीबाबत राज्य शासनाने यु डायसवर शाळेच्या मुख्याध्यापकांना माहिती नोंदविण्याचे फर्मान दिले आहे. त्यानुसार सर्व शाळांनी त्यांच्या शाळांच्या स्थितीबाबत यु डायसवर नोंदणी केलेली आहे. असे असतानाही राज्य शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा मोडकळीस आलेल्या असतानाही या गंभीर बाबीकडे सध्यातरी दुर्लक्ष केल्याची बाब दिसून येत आहे.२१ प्रस्ताव मंजूरजानेवारी ते आजतागायत जिल्हा परिषद शाळांकडून ५७ प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यातील २१ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरीत ३६ प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. यातील अनेक शाळा निर्लेखन करण्याचे ठराव घेण्यात आल्यानंतरही अशा धोकादायक इमारतीतच विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहे.धोकादायक इमारतींचे काही प्रस्ताव पाठविले असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या इमारतींच्या बांधकाम करण्यात येईल.- मोहन चोले,शिक्षणाधिकारी (प्राथ) भंडारा