शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

जि.प. अध्यक्ष बनल्या ‘पेपर टायगर’

By admin | Updated: January 5, 2017 00:35 IST

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे रजेवर गेले आहे.

अधिकारी जुमानेनात : लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गेले रजेवर भंडारा : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे रजेवर गेले आहे. त्यांचा प्रभार अद्यापही कुणाला देण्यात आला नसल्याने लघु पाटबंधारे विभागाला सध्या ‘शोधा’ असा प्रकार जिल्हा परिषदेत सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे अधिकारी एैकत नसल्यामुळे त्या केवळ ‘पेपर टायगर’ बनल्या आहेत. जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्याची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाकडे आहे. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावासह अन्य तलावांची देखभाल दुरूस्ती व सिंचन सुविधा करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे २६ डिसेंबरपासून रजेवर गेले आहेत. सद्यस्थितीत १० दिवसांचा कालावधी लोटला असतानाही या विभागाला कार्यकारी अभियंता मिळाला नसल्यामुळे लघु पाटबंधारे विभागाची गती मंदावली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्यासह काही पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार उपविभागीय अभियंता आर.एच. गुप्ता यांना देण्याच्या सुचना मुख्य कार्यपालन अधिकारी एस.एल. अहिरे यांना केल्या आहेत. मात्र येथील दुसऱ्या एका अधिकाऱ्याने यावर ‘जादूची कांडी’ फिरविल्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्यात मागील १० दिवसांपासून प्रभार देण्यासंदर्भात अंतर्गत कलह सुरु झाला आहे. अधिकारी हे उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांना प्रभार देण्यासाठी समर्थन करीत आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्षांनी आर. एच. गुप्ता यांच्या नावाला पसंती दिली आहे. दरम्यान रामदास भगत यांच्यावर गडचिरोली, अमरावती येथील प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे ते या पदासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. सोबतच पवनी येथे प्रभारी पद सांभाळत असलेल्या भगत यांनी समाधानकारक कामे केले नसल्याचा आरोप आहे. सिंचन विहिरीचा अनुशेष भरुन काढण्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र त्यात ते कमी पडले. सोबतच त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त असल्याने त्यांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी भगत यांना प्रभार देण्यासाठी विरोध दर्शविला आहे. मात्र अधिकारी त्यांच्या आदेशाला न जुमानता नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. (शहर प्रतिनिधी)