शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

जि.प. ईमारतीत रंगते ‘ओलीपार्टी’

By admin | Updated: January 3, 2017 00:25 IST

ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्या आहेत.

अध्यक्षांच्या कक्षालगतचा प्रकार : मुत्रीघरात आढळल्या दारुच्या रिकाम्या शिशा प्रशांत देसाई भंडारा ग्रामीण विकासाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या कक्षालगत असलेल्या मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी ओल्या पार्ट्या रंगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षालगत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मुत्रीघर आहेत. या मुत्रीघराच्या खिडकीत कुणीतरी मद्यप्राशन करुन मद्याच्या रिकाम्या शिशा ठेवल्या आहेत. दरम्यान ही बाब आज सोमवारला समोर आली. या दारूच्या शिशांमध्ये एक ‘देशी दारु’ची तर दुसरी ‘विदेशी दारु’ची शिशी आहे. उच्च व हलक्या दर्जाच्या मद्याच्या रिकाम्या शिशा मुत्रीघरात आढळून आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे काम हलक्या व दर्जेदार स्वरूपाचे होत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील नागरिक जिल्हा परिषदमध्ये विविध कामांसबंधात येत असतात. अनेकांच्या महत्त्वपूर्ण फाईल्स कर्मचारी मुद्दामपणे रेंगाळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो. रखडलेली कामे ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराशिवाय पुर्ण होत नाही. त्यामुळे अशाच कामाच्या निमित्ताने कुण्यातरी कर्मचाऱ्याने काम काढून घेण्यासाठी येथे ‘ओलीपार्टी’ केली असावी व मद्याच्या रिकाम्या शिशा मुत्रीघराच्या खिडकीत ठेवले असावे, असा कयास लावण्यात येत आहे. मुत्रीघरात मद्याच्या रिकाम्या शिशा आढळून आल्यामुळे असा प्रकार नेहमीच घडत असावा, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. या रिकाम्या शिशा आढळल्याने येथील कर्मचाऱ्यांवर अधिकारी तथा पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ठोस पाऊले उचलतील का? अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.