शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: May 6, 2016 00:32 IST

जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होणार आहेत.

६ ते १३ दरम्यान बदल्या : जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित राहतीलभंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले असून ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होणार आहेत. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुपदेशन कार्यक्रम वेळापत्रकानुसार होईल. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी वेळापत्राकानुसार हजर राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिल्या आहेत.६ मे रोजी सकाळी १० ते २ या कालावधीत सामान्य प्रशासन विभाग, लघुपाटबंधारे विभाग, वित्त विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, त्याच दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत पंचायत विभागातील बदल्यांचे कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. १० मे रोजी सकाळी १० ते १२ पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण विभाग, दुपारी १२ पासून आरोग्य विभाग, ११ मे रोजी सकाळी १० पासून शिक्षण विभाग माध्यमिक, १२ व १३ मे शिक्षण विभाग (प्राथमिक) असे बदल्यांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. बदल्या करताना सर्वप्रथम नक्षलग्रस्त भागात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या संमतीने त्यांना पाहिजे त्याठिकाणी बदली देण्यात येणार आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय दृष्टिकोनातून बदली करण्यात येईल. शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने विनंती बदलीसुध्दा करण्यात येणार आहे. पक्षघाताने आजारी कर्मचारी, अपंग, हदयरोग, किडणीरोग, कर्करूग्ण, आजी माजी सैनिकांची पत्नी, विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या, कुमारीका आणि वयाचे ५३ वर्ष पूर्ण करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती बदली करतांना पाच वर्षाची अट शिथील करण्यात आली आहे. प्रशासकीय बदलीत देखील सवलत देण्यात येणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यावर आक्षेप मागवून अंतिम यादी जिल्हा परिषद कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.