शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालविला. मात्र हाताला कामच नसल्याने अल्पावधीच उपासमारीची वेळ त्यावर आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये गाडी लोहार कुटुंबांची व्यथा : आपबिती सांगताना अनेकांचे डोळे पाणावले

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : लोखंडी हत्यारे बनवून विक्री करणे हा त्यांचा मुळचा व्यवसाय. मुळचे मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील असून दरवर्षी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करुन संसाराचा गाडा चालवित होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणुच्या थैमानाने होत्याचे नव्हते झाले. काम तर बंदच पण पोटाचाही प्रश्न सुटेना. अशातच गावकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीने भारावून जात जाता जाता 'जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब' म्हणत रवाना झाले. गाडी लोहार कुटुंब आपली आपबिती सांगाताना अनेकांचे डोळे पाणावले.वाचकांना कथानक वाटावे अशी ही वास्तवदर्शी चित्र आहे. लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथील चार महिन्यापुर्वी जवळपास होळीच्या सणाच्या दरम्यान मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील जवळपास १५ नागरीक बैलगाडीतून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात दाखल झाले. तालुक्याच्या ठिकाणाहून लोखंड विकत घेऊन आणणे व त्यापासून शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करुन विकणे हा त्यांचा मुळचा व्यवसाय.जवळपास १५ ते २० दिवस व्यवसाय केला अन् देशात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव दिसून आला. शासनाने जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्गमीत करताच यांचा व्यवसायही बंद पडला. चप्राड येथील समाजमंदिरात वास्तव्य करु लागले. सुरुवातीच्या दिवसात जमा असलेल्या पैशातून संसाराचा गाडा चालविला. मात्र हाताला कामच नसल्याने अल्पावधीच उपासमारीची वेळ त्यावर आली. त्यांनी बैलगाडीला असलेले बैल विकुन आपल्या संसाराचा गाडा चालविला. नंतर आपली समस्या गावातील पदाधिकाऱ्यांना सांगुन मदतीची विनवणी केली. गावातील नागरिकांनी जमेल ती मदत करुन त्यांच्या संसाराचा गाडा चालविण्यात हातभार लावला.संसार सुरु असतांनाच लॉकडाऊन वाढतच असतानाचे पाहुन त्यांनी स्वगावी जाण्याचा निर्धार करीत मदतिला धावणाºया पदाधिकाºयांना सांगितले. पदाधिकाºयांनी त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून त्यांना स्वगावी जाण्याची परवानगी दिली. स्वगावी जात असतांना उपस्थीत नागरिकांचे डोळे पाणावले असतांना प्रत्येकाच्या तोंडातुन एकच शब्द बाहेर पडत होते 'जिंदगीभर एहसान नही भुलेंगे साहब....' याप्रमाणे अनेक मजूर कोरोनाच्या संकटात अडकले असून त्यांच्या मदतीसाठी हात सरसावत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या