शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा

By admin | Updated: January 12, 2017 00:17 IST

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे.

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक : आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यास होणार कारवाईभंडारा : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश मिळताच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी वाहन जमा केले आहे. ग्रामीण विकासाची नाळ जुळलेल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात शासकीय दौरे तथा कार्यक्रमासाठी फिरता यावे यासाठी शासनाने त्यांना वाहन दिले. त्या वाहनातून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विशेष समितीचे सभापती हे दौरे करतात. काही दिवसापुर्वी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली. यावेळी आचारसंहिता असल्याने पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा झाले होते. त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत असल्यामुळे आचारसंहिता लागली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीचे चार सभापती यांच्या वाहनाबाबत दिलेले निर्देश पुढील आदेशापर्यंत लागु राहणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी शनिवारला आदेश निर्गमित केले आहे. त्याअनुषंगाने पदाधिकारी व त्यांच्या वाहनचालकांना आचारसंहितेचे उल्लंघन करु नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे पुढील तारखेपर्यंत या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा दौऱ्यासाठी वापर करता येणार नाही. त्यामुळे हे पदाधिकारी शासकीय वाहनांऐवजी खासगी वाहनाने भंडारा शहराबाहेरील दौरे करतील. (शहर प्रतिनिधी)आदेशात काय म्हटले आहे?विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहनांचा वापर जिल्हा परिषद कार्यालयापासून भंडारा शहरातील निवासस्थानापर्यंत करता येईल. वाहनांचा असा वापर केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे असे निर्देशात नमूद आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना बजावले आहे.