शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाच्या निलंबनावरून जिल्हा परिषद तापली

By admin | Updated: March 11, 2017 00:23 IST

तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक ए. एम. हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांनी आज काढला.

प्रकरण परसवाडा येथील शिक्षकाचे : सीईओंनी फिरविला निलंबनाचा आदेशभंडारा : तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक ए. एम. हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांनी आज काढला. ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. चे पदधिकारी व सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे निलंबनाचा आदेश रद्द करण्याची नामुष्की सीईओंवर ओढविली. परसवाडा येथील पदवीधर शिक्षक हलमारे यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची जिल्हा परिषद शिक्षण विभागाने चौकशी केली. यात ते दोषी आढळून आल्याचा अहवाल शिक्षण विभागाने मुख्य कार्यपालन अधिकारी अहिरे यांना सादर केला. दरम्यान हलमारे यांनी बदली करावी अशी भूमिका तुमसर येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने लावून धरली. यामुळे शिक्षकाची इतरत्र बदली करण्यात आली. या प्रकरणामुळे ग्रामस्थांनी शिक्षक हलमारे यांची बाजू घेत त्यांची बदली रद्द करावी यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका घेवून आठवडाभर शाळा बंद पाडली. यावर तोडगा म्हणून शिक्षक हलमारे यांना परत शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. आज तुमसर पंचायतची मासिक सभा होती. या सभेत शिक्षकाच्या निलंबनाची मागणी लावून धरत १४ मार्चपर्यंत कारवाई न केल्यास पंचायत समितीचे काम बंद पाडण्याचा ठराव घेतला. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी शिक्षक हलमारे यांच्या निलंबनाचे आदेश काढले. शिक्षकाच्या बाजूने अख्ख गाव असताना निलंबनाचा आदेश दुपट्टीपणा असल्याचा आरोप जिल्हा परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पदाधिकारी व सदस्यांनी केला. शिक्षकाचे निलंबन रद्द करावे या मागणीला घेवून जिल्हा परिषदेमध्ये जि.प. पदाधिकारी व सीईओ यांच्यात चर्चा झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल यांनीही जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून सीईओंना निलंबन रद्द करण्याबाबत भूमिका मांडली. त्यानंतर काही तासापुर्वीच निघालेले निलंबन आदेश सीईओंनी थांबविले. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्याने सीईओंना त्यांनीच काढलेल्या निलंबनाच्या आदेशाला थांबविण्याची नामुष्की ओढविली. (शहर प्रतिनिधी)सीईओ सापडले निलंबनाच्या कचाट्यातदुपारच्या सुमारास शिक्षक हलमारे यांच्या निलंबनाचा आदेश सीईओ अहिरे यांनी काढला. तो तुमसर पंचायत समितीला प्राप्त झाला. दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निलंबन मागे घेण्याबाबदची भूमिका घेतली. यामुळे निलंबन आदेश काढणारे सीईओच या कचाट्यात अडकले. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला निलंबन मागे घेत असल्याचे सांगून जि.प. मधून काढता पाय घेतला. वृत्त लिहीपर्यंत निलंबन मागे घेण्यात आल्याचा आदेशावर सीईओ अहिरे यांची स्वाक्षरी झालेली नव्हती. होळीनिमित्त सीईओ गावाकडे निघून गेल्याने या निलंबनाच्या प्रकरणावरुन पडदा उठलेला नाही.शिक्षण विभागात परसवाडा येथील शिक्षक हलमारे यांच्या प्रकरणाची चौकशी केली. यात ते दोषी आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यानंतरही त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही चुकीची असल्याने काढण्यात आलेला निलंबनाचा आदेश थांबविण्यात आलेला आहे.-राजेश डोंगरेउपाध्यक्ष, जि.प. भंडारा