भंडारा : जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीची सभा नुकतीच अध्यक्ष प्रभाकर कळंबे यांचे अध्यक्षतेखाली व सरचिटणीस टी.आर. बोरकर, कार्याध्यक्ष मारबते, अतुल वर्मा यांचे उपस्थितीत संपन्न झाली.जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सोसायटी सभागृह येथे संपन्न झालेल्या सभेत कर्मचारी वेतन दरमहा १ तारखेला व्हावे, महिला कर्मचारी करीता स्वतंत्र कक्ष तयार करणे, अशंकालीन महिला परिचर कर्मचारी वेतन दरमहा १ तारखेला व्हावे, मानधनवाढ करणे, कालबद्ध पदोन्नती, सेवाजेष्ठता यादी, स्थायी अस्थायी प्रस्ताव, अंशदायी पेंशन योजना, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा व्यतीत झालेला कालावधी सेवाकाळ धरणे, एकस्तर वेतन श्रेणी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, वैद्यकीय प्रतिपूर्ताचे प्रकरणे, ग्रामविकास अधिकारी रूपये ३५०० ग्रेड पे, लाखांदूर तालुक्यातील ग्रामसेवक हटकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून गुन्हा दाखल करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. गोपाल वारजुरकर, विलास खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष गायधने, विजय ठवकर, रमेश शिंगणजुडे, निंबार्ते, बिरनवार, सविता हटवार, माधुरी चोले, मंदा निर्वाण, सेन, सार्वे, शिवपाल भाजीपाले, जयंता गडपायले, नरेश कटरे, मदनकर यांच्यासह शिक्षक प्रतिनिधी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीची सभा
By admin | Updated: January 19, 2016 00:25 IST