शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद विश्रामगृह झाले इतिहासजमा

By admin | Updated: August 2, 2015 00:48 IST

स्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे.

शोभेची ब्रिटिशकालीन वास्तू : गतकालीन वैभव प्राप्त होण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज, नव्याने बांधणी करणे गरजेचेअशोक पारधी पवनीस्थानिक गांधी चौकात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विश्रामगृह अत्यंत दयनिय स्थितीत उभे आहे. इमारत विश्राम गृहाची असली तरी ते विश्रामगृह सद्यस्थितीत इतिहासजमा झालेले आहे. पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय कार्यालय तेथे स्थानांतरीत करण्यात आलेले आहे.गेल्या ३५ वर्षांपूर्वी पवनी तालुक्याचे ठिकाण नव्हते त्यावेळी जिल्हा परिषद विश्रामगृह 'सराम' या नावाने प्रसिद्ध होते. त्यावेळी लोकांची गाऱ्हाणी ऐकूण घेण्यासाठी जिल्हास्तरावरून अधिकारी महिन्याकाठी 'सराय'मध्ये येवून बसत होते. ग्रामीण जनतेच्या समस्या ऐकल्या जात होत्या. विश्रामभवनाच्या वऱ्हांड्यात त्यावेळी लोकांची वर्दळ असायची. काळात बदल झाला. अधिकारी सभांमध्ये व्यस्त झाले. पवनी तालुक्याचे ठिकाण झाले. लोकांना फारस्या समस्या उरल्या नाहीत. त्यामुळे सरायची गरज संपली. त्याचे विश्रामगृहात रूपांतर झाले. अलिकडे विश्रामगृहाची सुद्धा गरज ठरली नसावी. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. विश्रामगृह डागडुजी करून वापरण्यायोग्य राहीले नाही. त्याची नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे. चार-पाच वर्षापुर्वी विश्रामगृह निर्लेखित करून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने पारित केल्याचे ऐकिवात आहे. परंतु अंमलबजावणी झालेली नाही.विश्रामगृहाची पुन:बांधणी करायची म्हणजे बांधकामाचे मंजूरीपासून सर्व सोपस्कार करावे लागणार आहेत. पवनी शहरातील ऐतिहासिक गेटपासून ३०० मीटरपर्यंत बांधकामासाठी पुरातत्व विभाग परवानगी देत नाही. विश्रामगृह अवघ्या ५० मीटरच्या आंत आहे म्हणजे शासकीय बांधकामांनासुद्धा पुरातत्व विभागाची परवानगी मिळणार नाही आणि जिल्हा परिषदेने तरतुद जरी केली तरी सहजरित्या बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे दोन सुट असलेले ब्रिटीशकालीन विश्रामगृह अखेर इतिहासजमा झाले, असे मानल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.विश्रामगृहाचे भवितव्य राजकारणातील सक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ठोस पावले उचलली तर विश्रामगृहाला गतकालीन वैभव प्राप्त होण्यास विलंब लागणार नाही हे मात्र खरे आहे.