शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्हा परिषद निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST

कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी ...

कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी झाले आहे. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत ५२ गट आणि ७ पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गत काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, युती-आघाडी होणार की, स्वतंत्र लढावे लागणार याबाबत कोणताच निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला नाही. त्यामुळे प्रत्येकच पक्षाने जिल्हा परिषदांच्या सर्वच ५२ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, अशी आघाडी होऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्ते युती- आघाडी करा; परंतु ती निवडणुकीनंतर, अशी आग्रही भूमिका घेत आहेत. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढण्याचीच मानसिकता केली आहे. शिवसेना तर पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरू आणि भाजपला जागा दाखवू, असे सांगत आहे, तर भाजप सध्या राज्यात विरोधी पक्षात असल्याने स्वतंत्र निवडणूक लढवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहे.

बाॅक्स

मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वतंत्र लढले, तर मत विभाजनाचा फायदा भाजपला मिळेल, अशी काही जणांची भावना आहे. या तीन पक्षांनी गत विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात एकत्र येऊन निवडणूक लढली आणि भाजपचा गड असलेला मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला. असाच प्रयोग जिल्हा परिषदेत करावा, अशी भूमिका आहे, तर दुसरीकडे तीन पक्ष एकत्र लढल्यास स्थानिक पातळीवर बंडखोरी होऊन विरोधकांना त्याचा फायदा होईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता वरिष्ठ काय निर्णय घेतात आणि निवडणूक स्वतंत्र लढतात की एकत्र, याची उत्सुकता सर्वांना आहे.

बाॅक्स

स्थानिक आघाड्या उतरणार मैदानात

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत चार प्रमुख पक्षांसह इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्याही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार सेवक वाघाये यांनी अशी तयारी चालविली आहे. इतर गटही आघाड्या स्थापन करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तसेच वेळेवर तिकीट न मिळालेले अनेक बंडखोरही रिंगणात राहतील. त्यामुळे तिकीट वाटप करणे सर्वच पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

कोट

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्र लढण्याचे नियोजन केले आहे. कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे; परंतु आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल योग्य निर्णय घेतील. वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

-नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्र आणि स्वबळावर निवडणूक लढण्याची आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल; परंतु निवडणुकीनंतर युती करावी, अशी सर्वांची भूमिका आहे.

-मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

शिवसेना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपला या निवडणुकीत जागा दाखवायची आहे. भाजप सोडून कुणाशीही आम्ही आघाडी करू शकतो, तसेच वरिष्ठ जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन केले जाईल.

-ॲड. रवी वाढई, जिल्हा शिवसेनाप्रमुख