तारीक कुरैशी यांचे प्रतिपादन : कौशल्य विकास कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवन हे संघर्षमय आहे. समस्या जरी अनेक असल्या तरी त्यातून संधी निर्माण करता येते. चिकाटी, जिद्द व आत्मविश्वास यातून यशाच्या दिशेने वाटचाल करता येते. त्याकरिता युवकांनी ध्येय निश्चित करावे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी यांनी केले.एचडीएफसी बँक व नगरपरिषद तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, बँकेचे मॅनेजर उमेश वालिचा, संस्थेचे प्रतिनिधी दिपक, नगरपरिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक मेहताबसिंग ठाकुर, कैलाश पडोळे, पंकज बालपांडे, राजू गायधने, नगरसेविका वर्षा लांजेवार, विजय जैस्वाल, कृउबा समिती संचालक अनिल जिभकाटे, राहुल डोंगरे, अमित चौधरी आदी उपस्थित होते.सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी विचाराला कृतीची जोड देत तीन महिने प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी कठीण परिश्रम करावे असे प्रतिपादन प्रदीप पडोळे यांनी युवक, युवतींनी जीवनात कधीही निराश होऊ नये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी कौशल्य वाढविणे, नवनवीन कल्पना प्रत्यक्षात साकार करणे, १०० टक्के मेहनत करून यश आपल्या हातात आहे असा आत्मविश्वास करणारी व्यक्तीच पुढे जाते. असे प्रतिपादन राहुल डोंगरे यांनी केले. संचालन कौशल्य विकास कार्यक्रम तुमसरचे केंद्रप्रमुख गौरव नवरखेले यांनी केले. आभार नगरसेवक मेहताबसिंग ठाकुर यांनी केले. कार्यक्रमाला रोकडे, नाकाडे, विक्रम लांजेवार, ललीत शुक्ला, अनिल गभणे, जयंत भोयर, उषा जावळे, रत्नमाला लांजे, चेतन हट्टेवार, मोहीत मेश्राम, दुर्गा पडोळे, लक्ष्मी दुबे यांच्यासह प्रशिक्षणार्थी युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांनो पहिले ध्येय निश्चित करा
By admin | Updated: June 26, 2017 00:24 IST