शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरुणाईत क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

दशकापूर्वी महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाइन उत्सव आता गावखेड्यांपर्यंतही पोहोचला आहे. संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत साजरा केला जाणाऱ्या या दिवसाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावरही आता या डे चे फॅड वाढल्याचे दिसत आहे. पाश्चात्य राष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा दिवस अलीकडे भारतातही ग्रामीण भागात साजरा होऊ लागला आहे. या सप्ताहाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. रोज डे हा या सप्ताहातील पहिला दिवस.

संजय साठवणेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :  तरुणाईला भुरळ घालणारा प्रेमाचा आठवडा सध्या सुरू असून, विविध डे साजरे करण्यात तरुण-तरुणी मग्न झाले आहेत. कोरोनाच्या सावटातही व्हॅलेंटाइन सप्ताह उत्साहात सुरू असून, विविध वस्तूंनी भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठ सजली आहे.दशकापूर्वी महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाइन उत्सव आता गावखेड्यांपर्यंतही पोहोचला आहे. संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत साजरा केला जाणाऱ्या या दिवसाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावरही आता या डे चे फॅड वाढल्याचे दिसत आहे. पाश्चात्य राष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा दिवस अलीकडे भारतातही ग्रामीण भागात साजरा होऊ लागला आहे. या सप्ताहाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. रोज डे हा या सप्ताहातील पहिला दिवस. गुलाबपुष्प देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न तरुणाई करतात. ८ फेब्रुवारीला प्रपोज डे, ९ फेब्रुवारीला चाॅकलेट डे, १० फेब्रुवारीला टेडी डे, ११ फेब्रुवारीला प्राॅमीस डे, १२ ला किस डे, १३ ला हग डे आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.प्रेमी युगुलच नव्हे तर विविध नागरिकही हा दिवस साजरा करीत असल्याचे अलिकडे दिसत आहे. प्रेम करण्यासाठी सगळेच दिवस महत्त्वाचे असले तरी या काळात मात्र याला बहर येतो; परंतु यंदा कोरोना सावटामुळे शाळा - महाविद्यालय बंद असल्याने तेवढा उत्साह दिसत नाही; परंतु शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी फुलल्याचे दिसून येत आहे. भंडारा, साकोली, तुमसर येथेही मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी आले आहेत. तरुण-तरुणी गत दोन-तीन दिवसांपासून सप्ताह साजरा करण्यासाठी विविध वस्तुंची खरेदी करीत आहेत. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी अनेकांनी चालविली असली तरी कोरोनामुळे त्याला अनेक निर्बंध येणार आहेत.

प्रेमाचे प्रतीक गुलाब फुलांना मागणी वाढली व्हॅलेंटाइन सप्ताहाचा पहिला मान प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबाचे फुल आहे. त्यामुळेच सर्वत्र रोज डे साजरा केला जातो. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रेमीजीव आपल्या जीवलगासाठी गुलाबी गुलाबाचे फुल खरेदी करतात. काही जण पिवळा, पांढरा आणि इतरही रंगाचे गुलाब खरेदी करतात. रंगावरून प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे