शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने वाचविले बैलाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:24 IST

रस्त्याने जाताना दोन बैल एकमेकांवर तुटून पडले. अशातच या झुंजीत हे दोन्ही बैल जमिनीला समतल असलेल्या एका विहीरीत पडले. विहीरीत जास्त पाणी नव्हते. तोवर बैल विहीरीत पडल्याची वार्ता गावात पसरली. या बैलांना विहीरीतून बाहेर काढायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडला.

ठळक मुद्देदोन्ही बैल सुखरूप : कन्हाळगाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्त्याने जाताना दोन बैल एकमेकांवर तुटून पडले. अशातच या झुंजीत हे दोन्ही बैल जमिनीला समतल असलेल्या एका विहीरीत पडले. विहीरीत जास्त पाणी नव्हते. तोवर बैल विहीरीत पडल्याची वार्ता गावात पसरली. या बैलांना विहीरीतून बाहेर काढायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडला. शर्थीचे प्रयत्न सुरू झाले परंतु विहीरीत उतरण्यासाठी कुणी तयार नव्हता. अखेर किशोर पंचभाई नामक तरूणाने दोरखंडाच्या माध्यमातून विहीरीत उतरला आणि जेसीबीच्या सहाय्याने या बैलांना बाहेर काढण्यात यश आले.पवनी तालुक्यात रविवारला कन्हाळगाव येथे जांभुळे नामक शेतकऱ्याचे दोन बैल दुपारी दोन वाजताच्या सुमारास गावातीलच एका विहिरीत पडले. ही माहिती किशोर पंचभाई यांना कळली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी ५ वाजता कन्हाळगाव गाठले. विहिरीतील बैल काढण्यासाठी गावकºयांसोबत प्रयत्न केले. परंतु विहिरीतील बैल काढण्यात सर्वांना अपयश आले. त्या विहीरीला कड्या नव्हत्या. त्यामुळे विहीरीत उतरणार कोण? असा प्रश्न सर्वांसमोर होता. सरतेशेवटी कुणी तयार न झाल्यामुळे किशोर पंचभाई हे स्वत: कमरेला दोर बांधून विहिरीत उतरले.दोरखंडाच्या बळावर त्यांनी विहिरीतील पाण्यात उतरून दोन्ही बैलांना दोर बांधला. एक-एक करीत दोन्ही बैलांना जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गावकºयांनी किशोरच्या हिमतीला दाद देत कौतुक केले.