शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

रुपेश उर्फ वैभव रघुनाथ शहारे (१७) रा. वाही असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शुक्रवारी दुपारी घराची जनावरे ...

रुपेश उर्फ वैभव रघुनाथ शहारे (१७) रा. वाही असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शुक्रवारी दुपारी घराची जनावरे घेऊन गाव तलावाकडे चाराण्यासाठी गेला होता. सायंकाळी घराकडे परत येत असताना एक गाय तलावाच्या पाण्यात गेली. तिला काढण्यासाठी रुपेश तलावात उतरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि रुपेश व गाय दोघेही पाण्यात बुडाले. एकडे रुपेश हा जनावरे घेऊन घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. गावकऱ्यांच्या मदतीने तलावाकडे धाव घेतली. शोधाशोध केली असता तलावात गायीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यामुळे रुपेश ही तलावात बुडाला असावा अशी शंका आली. रात्री उशिरापर्यंत तलावात शोध घेण्यात आला. मात्र थांगपत्ता लागला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा गावकऱ्यांनी निष्टी व वाही येथील ढिवर बांधवांच्या मदतीने तलावात शोधाशोध सुरू केली. तेव्हा सकाळी ७.३० वाजताच त्याचा मृतदेह आढळून आला. पवनी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक गणेश बिसने तपास करीत आहेत.