शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात मारहाणीत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 00:56 IST

तंबाखू दिले नाही, या क्षुल्लकशा कारणावरून दोन इसमामध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.

आरोपीला अटक : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून केली आरोपीने बेदम मारहाणतुमसर : तंबाखू दिले नाही, या क्षुल्लकशा कारणावरून दोन इसमामध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास घडली. ही घटना शनिवारी सकाळ उघडकीस आली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी दोन तासाच्या आता आरोपीला अटक केली.सुधीर प्रल्हाद रामटेके (४०) रा. कुंभारेनगर असे मृत इसमाचे नाव आहे. आरोपी विकास उर्फ डबली दलिराम गिल्लोरकर (३५) रा. कुंभारेनगर हा रात्री यथेच्छ दारू पिऊन होता. रात्री १.३० वाजता तो सुधीर रामटेके यांच्या घरी गेला. मला तंबाखू दे, म्हणत त्याने सुधीरला झोपेतून उठविले. माझ्याजवळ तंबाखू नाही, असे त्याने सांगितले. तंबाखू का देत नाही म्हणून विकासने रात्रीच सुधीरशी वाद घातला. त्यानंतर सुधीरला घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सुधीर गंभीररित्या जखमी झाला. सुधीरच्या कानातून रक्तस्त्राव झाला. रक्तबंबाळ स्थितीत सुधीर घरी परतला आणि भोवळ येऊन पडला. सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुधीर रामटेके यांची पत्नी रसिका रामटेके यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवून तुमसर पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपी विकास गिल्लोरकर याला अटक केली. त्याच्याविरूद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी हे करीत आहेत.या मारहाण प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुमसर शहरात मागील काही दिवसांपासून असामाजिक तत्त्वांनी डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाने काही जणांविरूद्ध तडीपारची कारवाई केली आहे. डिसेंबर महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी स्थानबद्धतेची कारवाई करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)