शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरवासीयांना मिळणार "आरओ"चे शुद्ध पाणी

By admin | Updated: April 10, 2017 00:33 IST

येत्या एक दीड महिन्यात चार आरो प्लान्ट उभारुन तुमसरकरांना थंड व शुध्द पाणी पिण्यास देणार असल्याचा मानस

प्रदिप पडोळे यांची माहिती : तुमसरात चार ‘आरओ प्लान्ट’ उभारले जाणारतुमसर : येत्या एक दीड महिन्यात चार आरो प्लान्ट उभारुन तुमसरकरांना थंड व शुध्द पाणी पिण्यास देणार असल्याचा मानस नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.तुमसर शहराला कोष्टी व माडगी घाटातून पाणी वितरित होते. मात्र त्या पाईप लाईनमध्ये अनेक लिकेजस आहेत. तसेच फिल्टर प्लान्ट बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्याचा होणारा त्रास पाहता. शहरात न.प.द्वारे चार आरओ फिल्टर प्लान्ट उभारुन प्रत्येक नागरिकास ५० पैसात १ लिटर थंड आरओचा पाणी तसेच ज्यांना थंड पाणी नको असेल त्यांना ५ रुपयात २० लिटर आरओचे शुध्द पाणी देण्याची तयार त्या दिशेने सुरु केली असून येत्या एक दीड महिन्यात ही सुविधा तुमसरकरांना मिळणार आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा भिषण प्रश्नावर मात केल्या जावू शकते,असेही प्रदिप पडोळे यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील जीवनदायिनी नदी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी आटली आहे. जी स्थिती मे किंवा जुन महिन्यामध्ये असायला हवी ती मार्च मध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या ही भिषण रुप धारण करणार यात शंका नाही. त्यामुळ तातडीच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त विविध प्रयोगात विंधन विहिरी तयार करण्याकरिता प्रस्ताव सादर केले. त्याचबरोबर शहरातील टिल्लू पंप धारकांना वठणीवर आणण्याकरिता व शहरात सुरळीत पाणी पुरवठा होण्याकरिता पाणीपुरवठा करतेवेळी शहरातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र सादर करण्यात आले.इतकेच नव्हे तर नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने बावनथडी प्रकल्पातून पाणी उपलब्ध करुन देण्याचे सन २००६ पासूनचे थकीत असलेले १८ लक्ष रुपये संबंधित विभागास देण्यात आले आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी तुमसरकरांना मुबलक व शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी कटीबध्द असून त्या दिशेने पावले उचलले आहेत. त्यामुळे चिंतेचे कारण नाही असे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकासह सर्व पक्ष नगरसेवक, उपाध्यक्षा कांचन कोडवानी, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)