शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवा मतदार बळकट लोकशाहीचा आधार

By admin | Updated: January 26, 2017 00:52 IST

लोकशाही प्रणालीत मतदान प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व असून युवा व भावी मतदार हे बळकट लोकशाहीचा आधार आहेत.

राष्ट्रीय मतदार दिन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन, नवमतदारांना मतदान पत्रांचे वाटप भंडारा :  लोकशाही प्रणालीत मतदान प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व असून युवा व भावी मतदार हे बळकट लोकशाहीचा आधार आहेत. वयाची १८ वर्ष पूर्ण करणारे तरुण व तरुणी भावी मतदार असून या भावी मतदारांनी निवडणूक आयोगाचे सदिच्छा दुत कार्य करुन आपल्या परिसरातील नवमतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.७ वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, तहसिलदार संजय पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हयातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक मत महत्वाचे या विषयावर पथनाटय सादर केले. तसेच याच विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत सहभाग लाभला. यावेळी नवमतदारांनी मतदान पत्राचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिनाविषयी माहिती दिली. तसेच १८ ते २१ या वयोगटातील नवमतदारांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. १५ ते १७ या वयोगटातील उमदवारांनी आपली तयारी ठेवावी, असे सांगितले. ज्यांची नावे नव्याने नोंदवावयाची आहे, नावे मतदार यादीतून वगळायचे आहे, ज्यांना दुसऱ्या मतदार केंद्रात नाव स्थानांतर करावयाचे आहे, तसेच ज्यांच्या नावात बदल झालेला आहे, अशा मतदारांनी नमुना क्र. ६ , ७ व ८, 8-अ या नमुन्यात आपले स्वयंपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अनेकदा मतदारांचे नाव वगळणी न झाल्यामुळे निवडणूकी मतदानाची टक्केवारी कमी होते. म्हणून अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमास शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, नवमतदार, नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)