शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भंडारात देशी कट्ट्यासह तरुणास केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:12 IST

देशी कट्यासह छत्तीसगढ राज्यातील एका तरुणाला येथील वरठी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करुन बुधवारी पहाटे जेरबंद केले. त्याच्याजवळून १२२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात तरुणाजवळ देशी कट्टा आढळल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देनाकाबंदी : १२२ जिवंत काडतूस जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशी कट्यासह छत्तीसगढ राज्यातील एका तरुणाला येथील वरठी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करुन बुधवारी पहाटे जेरबंद केले. त्याच्याजवळून १२२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या काळात तरुणाजवळ देशी कट्टा आढळल्याने एकच खळबळ उडाली.शुभम सुब्रत नंदी (२३) रा. भिलाई हल्ली मुकाम गांधी वॉर्ड, तुमसर असे आरोपीचे नाव आहे. वरठी मार्गाने जाणा-या एका तरुणाजवळ देशी कट्टा असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांना मिळाली. त्यांनी दिलेल्या सुचनेवरुन भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण व पोलीस निरीक्षक रविंद्र चव्हाण यांनी पथकासह नाकांबद केली. बुधवारी पहाटे वरठी मार्गावर बॅरिकेट्स लावून तपासणी सुरु केली त्यावेळी २२ वर्षाचा तरुण शास्त्री चौकाकडून येताना दिसला. त्याला ताब्यात घेवून चौकशी केली. अंगझडती त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये एक लाकडी मूठ असलेला काळ्या रंगाचा देशी कट्टा आढळून आला. तसेच पॅन्टच्या खिश्यात १२२ जीवंत काडतूस आढळून आले. त्याला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणताही परवाना आढळला नाही. त्यामुळे त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्याच्याविरुध्द शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रविंद्र मानकर, उपनिरीक्षक खाडे, सहायक फौजदार रहांगडाले, हवालदार सुधीर मडामे, विनायक रहपाडे, धर्मेंद्र बोरकर, साजन वाघमारे, अजय कुकडे, चेतन कोटे, ठवकर, निर्वाण यांनी केली. निवडणूक काळात देशी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली आहे.