शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:54 IST

दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात तुमसर-देव्हाडी मार्गावर फादर अ‍ॅग्नेल शाळेसमोर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. सुरेश देशमुख (२४) रा.तुडका (देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमीचे नाव रवीशंकर एंचिलवार (२५) असे आहे.

ठळक मुद्देखड्ड्याने केला घात : तुमसर-देव्हाडी मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात तुमसर-देव्हाडी मार्गावर फादर अ‍ॅग्नेल शाळेसमोर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. सुरेश देशमुख (२४) रा.तुडका (देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमीचे नाव रवीशंकर एंचिलवार (२५) असे आहे.सुरेश देशमुख सकाळी ९ च्या सुमारास खासगी कामानिमित्त तुमसर येथे नव्या कोऱ्या दुचाकीने जात होते. विरुद्ध दिशेने रवी एंचिलवार दुचाकी क्रमांक एम.एच. ३६ डब्लू००६९ देव्हाडीकडे येत होता. फादर अग्नेल शाळेसमोर समोरासमोर दुचाकींची धडक झाली. यात सुरेश देशमुख यांची दुचाकी सुमारे २० ते २२ फुट फरफटत गेली. डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. पायाचे हाड मोडले. रक्ताच्या थारोळ्यात सुरेश यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.रवी एंचिलवार हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.सुरेश देशमुख व त्याच्या भावाने देव्हाडी येथे दुचाकी दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. एक नामवंत मेकॅनिक म्हणून त्याची ओळख होती. या घटनेने देव्हाडी व तुडका गावावर शोककळा पसरली.घटनास्थळी रस्ता खड्डेमय आहे. डाव्या बाजूचा रस्ता खड्डेमय असल्याने दुचाकी येथे उसळते.खड्ड्यात दुचाकी उसळल्याने ती अनियंत्रित झाली अशी चर्चा अपघातस्थळी होती. यापूर्वीही सदर रस्त्यावर अपघात घडले आहेत. ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे अपघात घडून जीव जात असताना बांधकाम विभागही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.रस्त्यावरील खड्ड्यांची येथे डागडुजी करण्याची गरज आहे. घटनास्थळी अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. सुरेशच्या मृत्यूमुळे देव्हाडी व तुडका येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.