शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात तरुण अभियंता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:26 IST

दुचाकीच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका तरुण अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला. भंडारा वरठी मार्गावर झालेल्या अपघातातील या अभियंत्याने २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.

ठळक मुद्देभंडाऱ्यातील घटना : २२ दिवस मृत्यूंशी झूंज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकीच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका तरुण अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला. भंडारा वरठी मार्गावर झालेल्या अपघातातील या अभियंत्याने २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला.निखिल मनोहर ठाकरे (३७) रा. मुखर्जी वॉर्ड, गांधी चौक परिसर भंडारा असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते वरठी येथील सनफलॅग कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. १ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ते ड्यूटीवर आपल्या दुचाकीने जात होते. भंडारा ते वरठी मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानडुकर आले. त्यात ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. विशेष म्हणजे ते हेल्मेट घालून होते पंरतु हेल्मेटचा बेल्ट लावला नसल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ही बाब रस्त्यावरुन जाणाºया नागरिकांच्या लक्षात आली. तात्काळ भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती भंडारात येताच प्रत्येकजण हळहळत होता.सोमवारी दुपारी वैनगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी स्नेहा, मुलगा शिव, आई-वडील, भाऊ व बहिण आहे.साडेतीन वर्षाच्या शिवने दिला पित्याच्या चितेला भडाग्नीवैनगंगा घाटावर निखिल ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा शिव याने चितेला भडाग्नी दिली. त्यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तरुण वयात निखिलचा मृत्यू झाल्याने भंडारा शहरात प्रत्येक जण हळहळत होता.