शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील गांधीसागर तलाव कात टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:27 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहराच्या मध्यभागी जुना मोठा गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाकरिता तुमसर नगरपरिषदेने २१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे त्याचा पाठपुरावा सध्या मंत्रालयात करीत आहेत. नागपूर येथील गांधी सागर तलावाच्या धर्तीवर तुमसरातील गांधीसागर तलाव कात टाकणार आहे. सध्या या तलावाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्दे२१ कोटींचा प्रस्ताव सादर : तलावाकरिता नगराध्यक्षांचा पाठपुरावा

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहराच्या मध्यभागी जुना मोठा गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाकरिता तुमसर नगरपरिषदेने २१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे त्याचा पाठपुरावा सध्या मंत्रालयात करीत आहेत. नागपूर येथील गांधी सागर तलावाच्या धर्तीवर तुमसरातील गांधीसागर तलाव कात टाकणार आहे. सध्या या तलावाची दुरवस्था झाली आहे.शहराच्या मध्यभागी नगरपरिषदेच्या मालकीचा एकमेव जूना गांधीसागर तलाव आहे. सध्या तलावाची दुरवस्था झाली आहे. यापूर्वी तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यात तलावाची एका बाजूला संरक्षण भिंत, तलाव खोलीकरण यावर सुमारे ३ ते ३.५० कोटी रूपयाचा निधी खर्च करण्यात आला. परंतू इतक्या कमी निधीत विस्तीर्ण पसरलेल्या तलावाचा कायापालट होऊ शकत नाही. पुन्हा नव्या दमाने गांधी सागर तलावाचे सौंदर्यीकरणाकरिता नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पुढाकार घेतला आहे.नागपूर येथील गांधीसागर तलावाच्या धर्तीवर देखणा तलाव तयार करण्याकरिता नगरपरिषदेने प्रस्ताव तयार केला. सुमारे २१ कोटींचा हा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आहे. यात तलाव खोलीकरण, उद्याणाचे नुतनीकरण, उर्वरित तलावाची संरक्षण भिंत, बोटींग, तलावाच्या मध्यभागी लहान उद्याणासारखे स्थळ, तलाव परिसरात देखणी वृक्ष लागवड, फुलांचे उद्यान इत्यादींचा त्यात समावेश आहे. सध्या प्रस्ताव मंत्रालयात असून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी मंगळवारी मंत्रालयात सदर प्रस्तावाचा पाठपुरावा घेतला. सौंदर्यीकरणामुळे शहराचे नावलौकीक वाढणार आहे. येथे शासनाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे.गांधी सागर तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून किमान १० ते १२ कोटी शासनाने मंजूर केले तरी उच्च दर्जाचे तलाव सौंदर्यीकरणाची कामे केली जातील. एक देखणा तलाव येथे तयार होईल. सध्या पाठपुरावा घेतला जात आहे.-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर.