शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात फेसयुक्त व काळसर पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:50 IST

नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कार्य आहे. तुमसर शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त व काळसर पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देइंदिरानगरातील प्रकार : नगर परिषदेचे दुर्लक्ष कारणीभूत, कावीळसह जलजन्य आजाराची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कार्य आहे. तुमसर शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त व काळसर पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपरिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. कावीळ तथा जलजन्य आजाराच्या भीतीेने नागरिकात भीती व्याप्त आहे.शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त तथा काळसर पाणीपुरवठा केला जात आहे. बादलीत पाणी घेतल्यावर साबणाचा फेसासारखा पदार्थ पाण्यात तरंगतांना दिसतो. पाण्याचा रंग काळाकुट्ट आहे. दूषित पाणी कसे प्यावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या पाण्याने आंघोळ कशी करावी. घरगुती वापराकरिताही दूषित पाणी कसा उपयोगात आणावा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.सहा महिन्यापूर्वी इंदिरा नगरात गढूळ (दूषित) पाणीपुरवठा केल्याने अनेक नागरिकांना कावीळ आजाराची लागण झाली होती. त्याची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. इंदिरा नगरातील अनेक नागरिक सध्या आरोचे पाणी विकत घेत आहेत. जलवाहिनी लिकेज असल्यामुळे नालीतील पाणी जलवाहिनीत जात असल्याचा आरोप इंदिरा नगरातील रहिवासी हरिश धार्मीक यांनी केला आहे.इंदिरा नगरातील दूषित पाणी पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचा कुणीही संबंधित विभागाचा कर्मचारी फिरकला नाही. नगरपरिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. पाण्यासारखी गंभीर विषयाकडे नगर परिषद प्रशासन तथा पदाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. ही समस्या मार्गी न लागल्यास स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.इंदिरानगरात दूषित पाणी पुरवठ्याबाबत मला माहिती नाही. याबाबत पाणीपुरवठा विभागाला निर्देश देऊन समस्या तात्काळ सोडवायला सांगेन. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत.- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी, न.प. तुमसर.मागील तीन दिवसापासून इंदिरानगरात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलवाहिनी लिकेजमुळे नालीतील लपाणी जलवाहिनीत शिरकाव करीत असावा. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- हरिष धार्मिक, रहिवासी, इंदिरा नगर, तुमसर.