शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शरीर, मन व आत्मा यांचे मिलन म्हणजे योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:55 IST

शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले.

ठळक मुद्देउज्ज्वल निकम : जिल्हयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन व मिलन म्हणजे योग अशी योगाची परिभाषा सांगून प्राचीन काळापासून योग विद्या भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी चतुर्थ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वेळी केले.जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, आय.एन.ओ. गुलाबबाबा योग प्राकृतिक चिकित्सालय व प्रशिक्षण केंद्र,युवा भारत,लायन्स क्लब, किसान सेवा समिती,जिल्हा योग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आज चतुर्थ योग दिनाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. उज्वल निकम होते. प्रमुख पाहूणे म्हणून उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे,जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, नेहरु युवा केंद्राचे रमेश अहिरकर, महिला पतंजली राज्य कार्यकारीणी सदस्य गिताताई इलमे, आय.एन. ओ. समन्वयक भगवान मस्के, भारत स्वाभिमान न्यासचे कोषाध्यक्ष किशोर श्रीरंग, लॉयन्स क्लबच्या कोषाध्यक्ष इंदीरा काबरा, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, जिल्हा महिला प्रभारी संध्या बांते उपस्थित होते.उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी व्यक्तीच्या शारिरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या महत्वपूर्ण असून सामान्य नागरिकांमध्ये योगाप्रती जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविकातून डॉ. रमेश खोब्रागडे यांनी योगाचा इतिहास व महत्व विशद केले. योगमय वातावरणात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घेवून योग विषयक माहिती जाणून घेतली.योग अभ्यास शिबीरात ग्रिना, चालन, स्कंध संचालन, स्कंध चक्र, कटी चालान्ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, मरीचासन, भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तान पादासन, अर्धहस्तासन पवन मुक्तासन, शवासन, अनुलोम-विलाम, कपालभाती, भ्रामरी प्राणायम, शितली प्राणायाम, व ध्यान इत्यादी योग व प्राणायामाचा या कार्यक्रमात अभ्यास करण्यात आला. ही आसने गिता इलमे यांनी शिकवली.संचालन व उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी लाखांदूरचे तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, मंगेश गुडधे, रविंद्र वाळके, सुरज लेंडे, राम घुडसे, वसंता पाल, संतोष शर्मा, स्नेहल तिडके, कांचन ठाकरे, चेतन झंझाड, डॉ. सुलभा मस्के, व इतर समित्यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम