शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या भरणाºया बैल बाजारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:16 IST

तालुक्यातील गायमुख जवळील रामपूर येथे अवैधरित्या बैल बाजार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. येथे नियमानुसार कारवाई कधीही झाली नाही.

ठळक मुद्देरामपूर येथील प्रकार : दलालांचे बाजारातून पलायन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील गायमुख जवळील रामपूर येथे अवैधरित्या बैल बाजार मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. येथे नियमानुसार कारवाई कधीही झाली नाही. बुधवारी पोलिसांनी आकस्मिक धाड घातली. यावेळी तिथे दुधाळू म्हशी आढळल्या. दुपारपर्यंत येथे बैल बाजार सुरु होता. पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच दलालांनी बाजारातून पळ काढला. अवैधरित्या भरणाºया बैल बाजार संदर्भात पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.गायमुख जवळील रामपूर येथे अनेक महिन्यापासून अवैध बैल बाजार अधिकाºयांच्या आदेशानुसार सुरु आहे. स्थानिक ग्रामपंचायतीची येथे परवानगी नसल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातून येथे मोठ्या प्रमाणात बैल विक्रीकरिता येतात. कामठी, नागपूर तथा हैद्राबाद येथे या बैलांची रवानगी कत्तलखान्याकडे केली जाते अशी माहिती आहे. बुधवारी येथे बैल बाजार भरतो. बुधवारी दुपारी येथे बैल बाजार सुरु झाला, परंतु पोलीस येणार असल्याची माहिती दलालांना मिळताच त्यांनी बैल बाजारातून बाजार बंद करून काढता पाय काढला. दलालांना कुणी माहिती दिली हा संशोधनाचा विषय आहे.आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले व त्यांच्यासोबत पाच पोलीस कर्मचाºयांनी बाजारावर धाड मारली. तेव्हा बाजारात केवळ दुधाळू म्हशी आढळल्या. पोलीस येण्यापूर्वीच येथे बैलांचा बाजार तात्काळ बंद करण्यात आला अशी माहिती आहे. लाखोंची बैल बाजारात उलाढाल होते. मागील अनेक महिन्यापासून भंडारा व नागपूर सीमेवर हा बैल बाजार भरीत आहे.बुधवारी दुपारी पाच पोलिसांसोबत स्वत: पेट्रोलिंग करिता राजापूर येथे गेले असता बैल बाजार भरला नव्हता. दुधाळू म्हशी आढळल्या. गुप्त माहितीच्या आधारे बाजारावर कारवाई करीताच आम्ही गेलो होते. नियमानुसार नक्कीच कारवाई करण्यात येईल.- अरुण गुरनुले,पोलीस निरीक्षक, आंधळगाव.