शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

होय, माणुसकी अजूनही जिवंत आहे, १३ हजार केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

सोमवारी सकाळी पृथ्वीराज मेश्राम गावाबाहेर फिरायला गेले होते. रस्त्याच्या कडेला एक पॉकिट दिसले. पॉकिटात नोटा होत्या. परंतु पॉकीट नेमके कुणाचा याचा काहीही उल्लेख नव्हता. शोधाशोध करूनही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोशल मीडियातून संबंधित पॉकीटधारकाचा शोध सुरु झाला. दुसºया दिवशी सदर पॉकीट गावातीलच थालीराम बावणे यांचे असल्याचे पुढे आले. गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या समक्ष १३ हजार २०० रुपये असलेले पॉकीट परत करण्यात आले.

ठळक मुद्देखराशीत प्रामाणिकतेचा प्रत्यय : लॉकडाऊनच्या आर्थिक आपत्तीत चांगला संदेश

मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या स्थितीतही माणसामधील माणुसकी जीवंत आहे. याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील खराशी येथे आला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला पॉकीट दिसले. उघडून पाहिले तर त्यात नोटाच नोटा होत्या. पॉकिट कुणाचे असेल असा विचार करीत शोधाशोध सुरु झाली. सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. अखेर दुसऱ्या दिवशी पॉकिट मालकाचा शोध लागला आणि ते त्याच गावातील सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीचे होते. पृथ्वीराज मेश्राम यांनी सापडलेले १३ हजार २०० रुपये त्याला परत केले.सोमवारी सकाळी पृथ्वीराज मेश्राम गावाबाहेर फिरायला गेले होते. रस्त्याच्या कडेला एक पॉकिट दिसले. पॉकिटात नोटा होत्या. परंतु पॉकीट नेमके कुणाचा याचा काहीही उल्लेख नव्हता. शोधाशोध करूनही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोशल मीडियातून संबंधित पॉकीटधारकाचा शोध सुरु झाला. दुसºया दिवशी सदर पॉकीट गावातीलच थालीराम बावणे यांचे असल्याचे पुढे आले. गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या समक्ष १३ हजार २०० रुपये असलेले पॉकीट परत करण्यात आले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर झळके, माजी उपसरपंच योगेश झळके, टिकेश्वर मेश्राम, तुळशीदास कठाणे उपस्थित होते.सुतारकाम करणाºया थालीराम बावणे आपले पॉकीट हरविल्याने विवंचनेतच होते. मात्र पॉकीट आपल्या घरी पैशासह आणून दिल्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आजही माणुसकी जीवंत आहे याचा प्रत्यय पृथ्वीराजच्या प्रामाणिकतेतून दिसून आला. कोरोना संकटाच्या काळात माणूस आपली माणूसकी अद्यापही विसरला नाही. सापडलेले पैसे परत करुन पृथ्वीराज मेश्राम यानी त्याचा प्रत्यय दिला. खरे तर लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आर्थिक अडचणीत सापडले आहे. पंरतु माणुसकी जीवंत असली की कितीही संकटे आली तरी माणुस आपल्यातील प्रामाणिकपणा सोडत नाही याचा प्रत्यय आला. तर आपले हरविलेले पॉकीट परत मिळणार यावर थलीराम बावने यांचा विश्वासही बसत नव्हता.गावकऱ्यांनी केले प्रामाणिकतेचे कौतुकपृथ्वीराज मेश्राम यांची प्रामाणिकपणे पैसे परत केल्याची वार्ता गावभर पसरली. सर्वत्र कौतूक होऊ लागले. शिक्षक डमदेव कहालकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी पृथ्वीराजचे घर गाठले. त्याच्या प्रामाणिकतेचे कौतुक करीत घरी छोटेखानी सत्कार केला.