शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

येरलीत फिरते पोलीस ठाणे उपक्रमाची ‘डाक्युमेंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:13 IST

‘फिरते पोलीस ठाणे’ हा भंडारा जिल्ह्याचा उपक्रम राज्यात लोकप्रिय ठरत असून या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली. देश पातळीवर हा उपक्रम राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘फिरते पोलीस ठाणे’ हा भंडारा जिल्ह्याचा उपक्रम राज्यात लोकप्रिय ठरत असून या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली. देश पातळीवर हा उपक्रम राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते संजय लिला भन्साली व अन्य चित्रपट निर्मितीत महत्वपूर्व तांत्रिक कामे करणारे एक युनिट तुमसर येथील येरली गावात शनिवारी सायंकाळी आले होते. या तांत्रिक युनिटने फिरते पोलीस ठाणे उपक्रमाची डाक्युमेंट्री तयार केली.पोलीस व सर्वसामान्य नागरिकांत समन्वय राहावा, भीती राहू नये, शांतता व सुव्यवस्था नागरिकांच्या मदतीने राहावी याकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी प्रायोगिक तत्वावर सुरु केला होता.या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद जिल्ह्यात मिळाला. या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन संपूर्ण राज्यात फिरते पोलीस ठाणे सुरु केले. या उपक्रमाची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. आता हा उपक्रम देशपातळीवर राबविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.मुंबई येथे राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी लाईव्ह डाक्युमेंट्री तयार करण्याकरिता इनोव्हेशन फिल्मस अँड एंटरटेनमेंट, मुंबई यांना देण्यात आली.या कंपनीच्या तंत्रज्ञांनी संजय लिला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी व अब तक ५६, २६/११ या चित्रपटाकरिता ‘एडीटिंग’ची कामे केली होती.येरली येथे तुमसर पोलीस ठाण्यातर्फे फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कंकाळे, समाज प्रबोधनकार राहुल डोंगरे, सरपंच रविता पारधी, उपसरपंच मुरली भगत, माजी सरपंच मदन भगत, नंदू राहांगडालेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.बाजीराव मस्तानी तथा संजय लिला भन्साली यांची डाक्युमेंट्री तयार करणारे तंत्रज्ञ आकाश कॅथे, अब तक ५६ व २१६/११ चित्रपटाचे एडिटींग करणारे सुयोग बांगर, धिरेंद्र सिंग, प्रज्ञा पाटील इत्यादींनी डाक्युमेंटरी तयार केली. यावेळी तुमसर पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली असून सदर उपक्रमाची डाक्युमेंटरी तयार करण्याकरिता मुंबई येथून चित्रपट निर्माते संजय लिला भन्साली यांच्यासोबत काम करणारे तंत्रज्ञांनी येरली येथे डाक्युमेंटरी तयार केली.-गजानन कंकाळे,पोलीस निरीक्षक, तुमसर