शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा पावसाळा शुभ संकेत घेऊन येण्याचे चिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : शेतकरी आजही निसर्गाच्या संकेताचा अभ्यास परंपरागत पद्धतीने करताना पावसाचा अंदाज बांधतात. आधुनिक तंत्रज्ञानातही त्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालांदूर : शेतकरी आजही निसर्गाच्या संकेताचा अभ्यास परंपरागत पद्धतीने करताना पावसाचा अंदाज बांधतात. आधुनिक तंत्रज्ञानातही त्यांचे अंदाज तंतोतंत नाही पण जवळपास खरे ठरतात, हा आजवरचा अनुभव आहे. चैत्र नवरात्रीत नऊ दिवसात वातावरणात झालेल्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यावरून यंदा पावसाळा चांगला राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या आरंभी व शेवटी पावसाचा जोर अधिक असण्याचे शुभ संकेत आहेत. कोरोना महामारीच्या काळात ही एक दिलासादायक बाब होय.

गतवर्षी पाऊस समाधानकारक बरसला. १०९ टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. पावसावर शेतीचे सर्व गणित अवलंबून असते. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजासोबतच परंपरागत पद्धतीने काढण्यात येणाऱ्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. शेतकरी चैत्र नवरात्रीच्या पर्वात नऊ दिवसांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधतात. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात होणारा वातावरणातील बदल नोंदवून अंदाज बांधला जातो. काही शेतकरी पक्ष्यांच्या हालचालींवरूनही पावसाचा अंदाज बांधताना दिसतात. त्यात कावळा वाळलेली काडी कसा उचलतो. त्याने तोंडात पकडलेली काडी कोणत्या दिशेने अधिक व कोणत्या दिशेने कमी याचाही अभ्यास करून अंदाज घेतला जातो. पक्षी घरटे कुठे बांधतात, किती उंचीवर बांधतात, याचाही अभ्यास करून पावसाचा काळ ठरवला जातो.

गत वर्षभरापासून भारतीय हवामान खात्याचे अंदाज पावसाच्या दृष्टीने निश्चितच तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. वर्षभरात भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाजपत्रक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेले आहे. याला शास्त्रीय आधार असला, तरी भारतीय शेतकऱ्यांचे पारंपरिक असलेले अनुभवसुद्धा काहीअंशी प्रेरणादायी किंवा मार्गदर्शक ठरत आहेत. हिंदी महासागरातील हवामानाच्या बदलावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग निश्चित होतो. तापमान अधिक वाढले की, पावसाची सुरुवात लवकर होण्यास मदत होते.

हिंदू संस्कृतीत नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राचीन काळापासूनच आहे. धार्मिक ग्रंथातून मिळालेला अभ्यास वास्तव परिस्थितीत तपासून नऊ दिवसांतील ऊन-पावसाचा खेळ पावसासाठी महत्त्वाचा ठरतो. नवरात्रीत सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व शेवटीसुद्धा हजेरी लावली. शेवटी हा अंदाज असला तरी काहीअंशी प्रेरक ठरतो.

- रमेश पराते

परंपरागत हवामान अभ्यासक, पालांदूर.