शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ओलिताअभावी यंदा उन्हाळी धानपीक निम्म्यावर

By admin | Updated: December 26, 2015 00:40 IST

सततची नापीकी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे यावर्षी ही शेतकरी खचला आहे. यावर्षीची शेतीची अवस्था व आलेले उत्पन्न बघता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : कर्ज फेडायचे तरी कसेसंजय साठवणे साकोलीसततची नापीकी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे यावर्षी ही शेतकरी खचला आहे. यावर्षीची शेतीची अवस्था व आलेले उत्पन्न बघता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाला असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. ओलीताअभावी यावर्षीही उन्हाळी धानपिकेही निम्म्यावर आली आहे. साकोली तालुक्यात रबी पिकाचे क्षेत्र २ हजार ९०३ हेक्टर एवढे असून यात गहू २८८ हेक्टर, हरभरा ५०० हेक्टर, लाख-लाखोरी ९८२, पोपट ६० हेक्टर, वाटाना २३ हेक्टर, उडीद १३९ हेक्टर, मुंग ४२ हेक्टर, मसूर २५ हेक्टर, जवस ६२० हेक्टर, मोहरी ४९ हेक्टर तर भाजीपाला १७५ हेक्टरला लावण्यात आला असून यावर्षीच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान होत असून खरीपानंतर शेतकऱ्यांना काहीशी रब्बी पिकावरील आशा आता निराशेत बदलली आहे.पंचायत समितीच्या कृषी विभागात चौकशी केली असता मागील वर्षी उन्हाळी धानपीक हे १ हजार २८० हेक्टरला होते. मात्र यावर्षी कृषी केंद्रावरील धान बियाणे, खते व औषधी विक्रीच्या तुलनेत ही लागवड अर्ध्यावर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे ओलीत यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने तळे, बोडी, विहिरीत पाणीच नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिक कसे हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.सरसकट कर्जमाफी दयायावर्षी पावसाअभावी व किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नापीकीमुळे बँक, सोसायटी, खत व औषधांचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन कृषीपंपाचे विजबिल माफ करावे, अशी मागणी जि.प. सदस्य होमराज कापगते यांनी केली आहे.