शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

किटाडीच्या दिव्यांग योगेश्वरची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:17 IST

जिद्द आणि चिकाटीचे फळ : राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत ४८ पदके देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पोलीओमुळे लहानपणीच ...

जिद्द आणि चिकाटीचे फळ : राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत ४८ पदकेदेवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीओमुळे लहानपणीच अपंगत्व आलं. खेडेगावात मार्गदर्शनाचाही अभाव. मात्र आतील खेडाळू त्याला स्वस्थ बसु देत नव्हता. जिद्द, चिकाटीच्या बळावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत एक - दोन नव्हे तर तब्बल ४८ पदक पटकाविली. भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेत आपल्या गावाचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. हा आहे लाखनी तालुक्यातील किटाडी बाजार येथील दिव्यांग योगेश रवींद्र घाटबांधे.अडीच हजार लोकवस्तीच्या किटाडीत योगेश राहतो. लहानपणीच त्याला पोलिओमुळे अपंगत्व आलं. पंरतु यासर्व विपरीत परिस्थितीवर मात करीत त्याने खेळण्याची जिद्द सोडली नाही. योगेश्वरने आतापर्यंत ४८ पदक पटकाविली असून त्यात १८ सुवर्ण, १६ रोप्य आणि १४ कास्य पदकांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपंगाच्या १४ व्या वरिष्ठ आणि ८व्या कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत त्याने एफ ५६ गटात भालाफेक, थालीफेक आणि गोळाफेक मध्ये कांस्य पदक पटकाविले. कोल्हापुरच्या राज्यस्तरीय अपंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रजत पदके पटकावून त्याने जिल्ह्याची मान उंचाविली.योगेश्वरला नागपूर येथील विरजा अपंग प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्ष दिव्यांग रेणुका बिडकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आणि त्यांच्यामुळेच पहिली संधी मिळाली. चार आंतरराष्टÑीय, सहा राष्टÑीय, १६ राज्यस्तरीय स्पर्धेत तो आतापर्यंत सहभागी झाला आहे.बंग्लोर, चंदीगढ, गजीयाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी झाला. उत्तरप्रदेशातील पॅराअ‍ॅथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे कर्णधारपद भुषविले. दिव्यांगत्वावर मात करुन त्याने खेळात यश मिळविले. यासोबतच तो सामाजिक उपक्रमातही हिरीरीने भाग घेतो. भंडारा जिल्हा पाणलोट समितीचा जिल्हाध्यक्ष आहे.किटाडीच्या ग्राम दक्षता समितीचा सदस्य असून ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यावरण समितीतही त्यानी उल्लेखनीय कार्य केले आहे. योगेश्वरने इतिहास आणि मराठी या विषयात एम.ए. केले असून एम.एड. झाले आहे.सध्या तो किटाडी येथे एका कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पॅराआॅलम्पिक स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करुन सुवर्ण पदक मिळवून देण्याची त्याची अपेक्षा आहे. स्वत:ला दुर्बळ समजू नका, मनात जिद्द असेल तर जगात कोणतीच गोष्ट शक्य नाही, असे योगेश्वर घाटबांधे यांनी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने सांगितले.विविध पुरस्कारांनी गौरवयोगेश्वर घाटबांधे याला आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात २०११-१२ मध्ये जिल्हा क्रीडा विशेष खेळाडू पुरस्कार, उत्कृष्ठ क्रिकेट समालोचक राज्य पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापिठस्तरीय बेस्ट ग्रुप लीडर पुरस्कार, आणि २०१८ साली क्रीडा गौरव पुरस्कार मिळाला.