शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा मृतदेह घरात, मुलीने दिली बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:08 IST

रेशमा हिरामण वरकडे ही कारधा येथील शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे. वर्षभर बारावीचा अभ्यास केला. घरात वडिलांचे आजारपण असतानाही तिने मन लावून अभ्यास केला. वडिलही तिला अभ्यासासाठी सातत्याने प्रोत्साहित करीत होते. मात्र ऐन परीक्षेच्या काळात वडिलांची प्रकृती आणखी बिघडली.

ठळक मुद्देदु:ख गिळून लिहिला पेपर : भंडारा तालुक्यातील दिघोरी येथील विद्यार्थीनी

दिनेश रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (दिघोरी) : आजाराने वडिलांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बारावीचा पेपर. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना एका विद्यार्थीनीने वडिलांच्या मृत्यूचे दु:ख हृदयात ठेवत बारावीचा पेपर दिला. पेपर सोडविल्यानंतर आपल्या लाडक्या लेकीला अखेरचा निरोप दिला. ही घटना आहे भंडारा तालुक्यातील दिघोरी येथील.रेशमा हिरामण वरकडे ही कारधा येथील शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत आहे. वर्षभर बारावीचा अभ्यास केला. घरात वडिलांचे आजारपण असतानाही तिने मन लावून अभ्यास केला. वडिलही तिला अभ्यासासाठी सातत्याने प्रोत्साहित करीत होते. मात्र ऐन परीक्षेच्या काळात वडिलांची प्रकृती आणखी बिघडली. अशातच गुरूवारी सकाळी वडील हिरामण टिकाराम वरकडे (५४) यांचे निधन झाले. त्याच दिवशी रेशमाचा बारावीचा मराठीचा पेपर होता. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वडिलांचा मृतदेह घरात असताना तिने जड अंतकरणाने बारावीचा पेपर देण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी याला प्रोत्साहन दिले. ती आपल्या लाडक्या पित्याच्या मृतदेहाचे दर्शन घेवून कारधा येथील प्रकाश हायस्कूलमध्ये बारावीचा पेपर देण्यासाठी गेली. दु:ख बाजूला सारत तिने बारावीचा पेपर सोडविला. पेपर सोडवून आल्यानंतर तिने आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिला.जड अंतकरणाने अखेरचा निरोपबारावीचा मराठीचा पेपर सोडवून आल्यानंतर रेशमाने आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हिरामण वरकडे कारधा येथील एका सोयाबीन कंपनीत कामाला होते. मात्र गत काही दिवसांपासून आजारी होते. या आजारातच त्यांचा मृत्यू झाला. हिरामण वरकडे यांच्या मागे पत्नी, चार मुली आहेत.

टॅग्स :examपरीक्षा