शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे रिडिंग, ग्राहकात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:54 IST

साकोली तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे मीटर रिडींगमध्ये अनियमितता सर्वत्र दिसून येत आहे. याचा मानसिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देकारभार वीज वितरणचा : दुर्लक्षित धोरणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे मीटर रिडींगमध्ये अनियमितता सर्वत्र दिसून येत आहे. याचा मानसिक त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.साकोली येथील एक ग्राहक ज्याचा मिटर नंबर १२३५६३ आहे त्यांना ८ एप्रिल २०१९ ला वीज बिल देण्यात आले. त्यामध्ये चुकीचे रिडिंग दाखविण्यात आले. सबंधित ग्राहकांनी याची तक्रार केली असता टेस्टींग विभागाने याची दखल घेत ५७ युनिट जास्त दाखविण्यात आल्याचे उघडकीस आले. ग्राहकाला या कार्यालयातून त्या कार्यालयात नाहक चकरा माराव्या लागल्या. याचा मनस्ताप ग्राहकाला सहन करावा लागला. शेवटी उपकार्यकारी अभियंता यांनी बिलामध्ये दुरूस्ती करून दिली. चुकीचे रिडींग घेण्याचा प्रकार तालुक्यात सर्वत्र दिसून येतो. मिटर रिडिंगचे कार्य खाजगी एजेंसी कडून करण्यात येते. वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत आहे.नवीन मीटरची प्रतीक्षाअनेक ग्राहकांना मीटरमधील तांत्रिक बिघाडामुळे नवीन मीटर बसविण्यास सांगितले असून वारंवार पाठपुरावा करूनही नवीन मीटर बसविण्यास वीज वितरण कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात आहे. याचाच भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ग्राहकांना नेहमीच जास्तीचे बिल येत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. अनेक ग्राहकांना वीज वितरण कार्यालयाचे कर्मचारी नवीन मीटर बसविण्यासाठी उपलब्ध नसल्याचे कारण सांगतात. तब्बल चार महिन्यानंतर नवीन मिटर मिळाल्याचे ग्राहक सांगतात. यावर प्रशासनाने त्वरीत दखल घेवून वाढीव बिलासंदर्भात ग्राहकांना न्याय देणे गरजेचे आहे.यामध्ये वीज वितरण कंपनी व ग्राहकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. यावर त्वरित उपाय योजना व कारवाई करण्यात येईल.-आर.एम. नंदनवार, उपकार्यकारी अभियंता, साकोली.