शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचे शिक्षकांचे विस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:25 IST

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापुरे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छापुरे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांची पुर्तता १५ दिवसात न झाल्यास संघटनेद्वारे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.आॅनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोनमधील शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे व चुकीचे अंतराचा पुरावा देऊन बदली पोर्टलवर माहिती भरली. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले. चुकीची माहिती भरणाºयांची सक्षम संघटनेद्वारे चौकशी करून त्यांच्याविरूद्ध जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. अन्यायकारक पद्धतीने विस्थापित झालेल्या शिक्षकांना न्याय मिळविण्यासाठी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षकांचे निश्चित करून रिक्त जागा त्वरीत भरणे, ११७ आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या २०१६ मधील माहे मे २०१६ व जून २०१६ या दोन महिन्याचे थकित वेतन त्वरीत अदा करणे, वर्ग ६ ते ८ ला शिकविणाऱ्या विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लावणे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रकरणास मुल्यमापन समितीद्वारा मंजुरी देणे, मोहाडी पंचायत समितीमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे जीपीएफ पावत्या उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचे थकित अनुदान अविलंब मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा करणे, मंजूर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढण्यासाठी तालुका स्तरावरून माहिती मागवून आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करून प्रकाशित करणे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी १५ दिवसाचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर जिल्हा संघटना निर्णय घेण्यासाठी मोकळी राहील, असे सांगण्यात आले.यावेळी संजीव बावनकर, रमेश काटेखाये, शंकर नखाते, राधेश्याम आमकर, दिलीप बावनकर, विकास गायधने, बाबुराव गिऱ्हेपूंजे, उमेश गायधने, विवेक हजारे, नरेंद्र कोहाड, सुभाष खंडाईत, वनवास धनिस्कर, योगेश कुटे, चेतन बोरकर, राजकुमार चांदेवार, सुधीर वाघमारे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.