शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची रक्त तपासणी रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:57 IST

ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्देमोहाडी रुग्णालयातील प्रकार : रुग्णांना मनस्ताप

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे महालेब्स अंतर्गत रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते, मात्र जो अहवाल देण्यात येतो तो पूर्णत: चुकीची मिळत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. या चुकीच्या अहवालाने तर अनेकदा चांगल्या रुग्णांनाही भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने येथील जनतेत असंतोष आहे. चुकीच्या अहवालामुळे एखाद्या वेळी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नि:शुल्क प्रयोग शाळा व चाचण्या निदान योजना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने पॅथालॅजिस्ट डॉ.हितेंद्र खांडेकर यांच्याकडे पाठविले जातात, मात्र त्यांच्याकडून आलेली रक्त तपासनीचा अहवाल पूर्णत: चुकीचा असतो. एखाद्या रुग्णांचा हिमोग्लोबिन बरोबर असतानाही कमी दाखविला जातो. 'प्लेटलेट' कधी जास्त, तर कधी कमी दाखविली जाते, यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर गोंधळतात, परंतु याचा सर्वाधिक मनस्ताप रुग्ण व त्यांच्या कुटुंबावर होतो. काही रुग्णांना येथे रक्ताच्या प्लेटलेट चुकीच्या दर्शविण्यात आल्याने त्यांना नागपूर येथे दाखल करण्याची वेळ आल्याची घटना घडल्या आहेत.मात्र याकडे जिल्हा चिकित्सकांचे लक्ष नाही. दोन दिवसांपूर्वी मोहाडी येथील रवींद्र शामराव पाटील यांच्या दोन वर्षाच्या मुलीला ताप येत असल्याने त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केली. रक्त तपासण्याचा जो अहवाल आला त्याने त्यांचे धाबेच दणाणले. त्यात हिमोग्लोबिन ७.६ ग्रॅम आणि प्लेटलेट केवळ ०. ५४ लक्ष दर्शविण्यात आले होते. याशिवाय रक्ताच्या इतर चाचण्या चुकीच्या होत्या. त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला भंडारा येथे नेले व पुन्हा डॉ. हितेंद्र खांडेकर यांच्या खाजगी लॅब मध्ये रक्त तपासणी केली असता हिमोग्लोबिन १०.५ ग्रॅम आणि प्लेटलेट ३ लक्ष ९ हजार असल्याचा अहवाल प्राप्त झाला. एकाच डॉक्टरकडून दोन वेगवेगळा अहवाल कसा देण्यात आला, हे विचार करण्याजोगे आहे, मात्र रवींद्र पाटील यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.अव्यवस्थेकडे सर्वांचेच दुर्लक्षग्रामीण रुग्णालयात शिक्षित व उच्च शिक्षित अधिकारी-कर्मचारी तसेच धनदांडगे व्यक्ती सहसा उपचारासाठी जात नाही. शेतकरी, शेतमजूर, गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी तेथे अधिक जातात. त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयातील अशा अव्यवस्थेकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात, ना जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी लक्ष देतात. त्यामुळेच येथील अव्यवस्था व कामचुकारपणावर कुणाचेही अंकुश नाही. गरिबांच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरू आहे. हा प्रकार केव्हापर्यंत सुरू राहणार, हे एक कोडे आहे. अशाच कारणामुळे मग एखादेवेळी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आले आहेत.