शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

बालमजूर कायद्याचा वचक नावापुरता

By admin | Updated: April 27, 2017 00:25 IST

जिल्ह्यातील हॉटेलमध्ये, कारखान्यांमध्ये गॅरेजमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर बालमजूर काम करीत असल्याचे दिसून येत आहे.

भंडाऱ्यात कारवाई शून्य : या बालकांचा समावेश शाळाबाह्यमध्ये?इंद्रपाल कटकवार भंडाराजिल्ह्यातील हॉटेलमध्ये, कारखान्यांमध्ये गॅरेजमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर बालमजूर काम करीत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थतीच्या कचाट्यात सापडल्याने या बालकांची अवस्था समजून घ्यायला, कुणीही वाली नाही. सक्तीच्या शिक्षणाचा उदोउदो होत असताना खऱ्या अर्थाने ही बालके शाळाबाहय आहेत काय? असा सवालही उपस्थित होत आहे. आर्थिक परिस्थितीने खचलेल्या कुटुबांतील चिमुकल्याच्या गरजेचा गैरफायदा घेऊन तुटपुंज्या वेतनावर राबविणाऱ्या मालकांनीच बालमजुरी कायदा खिशात कोंबला आहे. १६ वर्षांच्या आतील बालकांना कामगार म्हणून नोकरीला ठेवणाऱ्याला २0 हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांचा कारावास अशी तरतूद आहे. मात्र ते कागदावरच आहे. बालमजुरीविरोधी समितीची धाड पडूनही अनेक मालकांना कारवाईची झळही बसत नाही. सन १९८६ च्या बालमजुरी कायद्याला मालकवगार्ने पार बासनात गुंडाळल्यामुळे बालकामगार कामाच्या ओज्याखाली दबल्याचे दिसून येते. भंडारा शहरात काही ठिकाणी या बालमजुरांना राबवून घेतले जाते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे बालमजूर कार्यरत आहेत, त्या ठिकाणी अधिकारी वर्गाचेही आवागमन असते. परंतूू याकडे नेहमी कानाडोळा केला जातो. आजची पिढी ही देशाचे भविष्य आहे, अशी ज्वलंत व तेवढीच संवेदनशील वक्तव्ये करणाऱ्या मंडळींना दुकान, टपरी किंवा अन्य ठिकाणी काम करणारी बालके का दिसत नाहीत? हाही खरा सवाल आहे. दुसरीकडे गाव-खेड्यासह शहरातील गल्लोगल्ली फिरून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जातो. मग हे बालमजूर खरचं शिक्षण घेताहेत की नाही याचाही उहापोह होणे महत्वाचे आहे. तळागाळातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात सक्तीन आणली तरच बालमजुरी या समस्येला पूर्ण विराम मिळू शकतो. हे कळत असूनही वळत नाही, हे वाढत्या बालमजुरीमागचं दुखणं आहे. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचे दिसून येते.बालमजुरी कायद्याचा जन्म होऊन २५ वर्षे झालीत. मात्र हा कायदा बालमजुरीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या चिमुकल्यासाठी आहे की. त्यांना राबविणाऱ्या मालकांसाठी, हाही एक ज्वलंत प्रश्न आहे. बालमजुरी विरोधात लढणाऱ्या संघटना भेट देऊन बालमजुरानां मुक्त करतात व संबंधित मालकाविरोधात तक्रार देतात. परंतु अल्पवयीन मुलांना नोकरीवर ठेवणाऱ्या मालकावर कारवाईचा घाव मात्र बसत नाही. यामुळे मालकवगार्ला कायद्याचा वचक नावापुरताच असल्याचे दिसते. सन १९६८ च्या कोठारी आयोगानुसार राहत्या परिसरातच मुलांना शाळेत घालण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र या आयोगातील शिफारशी अनेक वर्षे धूळ खात पडल्या. आता प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले असले तरी अनेक मुले या सुविधेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. आरटीई अ‍ॅक्टनुसार ६ ते १४ वयोगटातील कोणताही बालक मुलभूत शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही. शाळाबाह्य बालकांचा शोध घेवून त्यांना शिक्षण व पोषण आहारची सोय करून दिली जाते. अशा बालकांसाठी वेळप्रसंगी नियमाला अनुसरून शासकीय वसतीगृहात राहण्याची सोय केली जावू शकते. याबाबत जनतेनेही बालमजुर ंिकंवा शाळाबाह्य मुलांची माहिती संबंधित यंत्रणेला देणे गरजेचे आहे.- मोहन चोले, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा.