शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही त्यांचे डोळे पाहणार जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:28 IST

‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे.

ठळक मुद्देनेत्रदानाचा संकल्प : तुमसरातील लांजेवार कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी तातडीने निर्णय घेऊन नेत्रदान करण्याचा संकल्प केला. रूग्णालय प्रशासनाने दखल घेऊन अवघ्या तीन तासात डोळे सुस्थितीत काढून नेत्रपेढीत रवाना केले. त्यामुळे मृत्युनंतरही त्यांचे डोळे पुन्हा जग पाहणार आहेत.तुमसर येथील माकडे नगरातील प्रगतशील शेतकरी अनिल घनश्याम लांजेवार (५८) यांना २० सप्टेंबरला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तुमसर येथील नेताजी सुभाषचंद्र उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले.अनिल यांचे धाकटे भाऊ सुनिल लांजेवार यांनी त्यांना डॉ.कोचर यांचेकडे नेण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूरला नेताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा दुसरा धक्का बसला. भंडारा येथे एका खाजगी रूग्णालयात नेल्यावर डॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर तुमसर येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले.धाकटे भाऊ मुंबईत होते. त्यांनी पत्नी शोभा लांजेवार (माजी नगरसेविका) यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भाऊचे नेत्रदान करावयाचे आहे. वहिनी गीता लांजेवार, मुलगी अनघा चोपकर यांना याबाबत सांगून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचे सांगितले. शोभा लांजेवार यांनी नेत्रदानाची माहिती देताच गीता लांजेवार व त्यांची मुलगी अनघा यांनी लगेच तयारी दर्शविली.सुनील लांजेवार यांनी डॉ.सचिन बाळबुद्धे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाबाबत त्यांना सांगितले. डॉ.बाळबुद्धे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रविशेखर धकाते यांना तुमसरातील नेत्रदानाची माहिती दिली. डॉ. धकाते यांनी भंडारा येथून नेत्रतज्ज्ञ डॉ.आगाशे व पथकाला तुमसर येथे रवाना केले. मृत्यूनंतर अवघ्या तीन तासात अनिल लांजेवार यांचे डोळे सुखरूप काढण्यात आले. वैद्यकीय नियमानुसार मृत्यूपश्चात सहा तासात डोळे काढावे लागतात. डोळे काढल्यानंतर ते भंडारा येथे नेण्यात आले. यात डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.अंत्यसंस्कारानंतर मानवाचे सर्वच अवयव नष्ट होतात. मानवी अवयव गरजूंना मिळणे गरजेचे आहे. एका मानवाचे अवयव दुसºयाच्या कामी आले पाहिजे. ही उदात्त भावना जागृत होण्याची गरज आहे. स्नेह नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून नेत्रदान, किडनीदान, देहदान, यकृतदान हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.- सुनील लांजेवार, अध्यक्ष स्नेह नागरी पतसंस्था तुमसर.